You are currently viewing मध्य रात्रीपर्यंत मिरवणुका न काढता, दहा वाजण्यापूर्वी गणेश मूर्तींचे विसर्जन करून प्रशासनाला सहकार्य करावे – पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे

मध्य रात्रीपर्यंत मिरवणुका न काढता, दहा वाजण्यापूर्वी गणेश मूर्तींचे विसर्जन करून प्रशासनाला सहकार्य करावे – पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे

सावंतवाडी :

 

सद्यस्थितीत गणेश चतुर्थीचा सण आहे. त्यामुळे सर्वजण त्या सणाच्या गडबडीत व्यस्त असणार आहे. त्यामुळे सावंतवाडी तालुक्यात गणेश चतुर्थीच्या काळात चोऱ्या होऊ नये यासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी. मौल्यवान वस्तू, दागिने पूजनासाठी ठेवू नये, असे आवाहन सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी केले. तसेच मध्यरात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणूक न काढता १० वाजण्यापूर्वी गणेश मूर्तींची विसर्जन करून प्रशासनाला सहकार्य करावे असेही त्यांनी म्हटले आहे.

सावंतवाडी पोलिसांकडून या काळात चोरट्याने रोखण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. गस्त सुरू आहे. मात्र मनुष्यबळा अभावी काही गोष्टींवर मर्यादा येतात. त्याचा फायदा घेऊन चोरटे आपल्या घरात चोरी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपल्या मौल्यवान वस्तू, रोख रक्कम, बँक लॉकरमध्ये अथवा सुरक्षित ठिकाणी ठेवावे. शेजाऱ्यांना घरी लक्ष देण्यास सांगावे. आपल्या घराभोवती कोणी संशय व्यक्ती किंवा वाहन आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून याबाबतची माहिती द्यावी. गावात सरपंच, उपसरपंच यांनी पुढाकार घेऊन तरुणांच्या मदतीने गस्त घालावी. तसेच गावात कायमस्वरूपी लोकवर्गणीतून चौकाचौकात सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात यावी, असेही आव्हान मेंगडे यांनी प्रसिद्ध पत्रकार द्वारे केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा