You are currently viewing सनराइज टॉवर मध्ये केलेल्या भ्रष्टाचार प्रकरणी सुशांत नाईक यांनी लोकांचे पैसे परत करण्याची तयारी ठेवावी

सनराइज टॉवर मध्ये केलेल्या भ्रष्टाचार प्रकरणी सुशांत नाईक यांनी लोकांचे पैसे परत करण्याची तयारी ठेवावी

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा सुशांत नाईक यांना इशारा

कणकवली

दुसऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून स्वतः सज्जन पणाचा आव आणणारे माजी गटनेते सुशांत नाईक यांनी बांधलेल्या सनराइज टॉवर मध्ये जनतेची फसवणूक केली आहे. करोडोची प्रॉपर्टी विकली मात्र या संपूर्ण सनराइज टॉवरला नगरपंचायतीची ओसी प्रशासनाने दिलेली नाही. त्यासाठी लागणारा नियम अटी पूर्ण केलेल्या नाहीत. येत्या आठ दिवसात सुशांत नाईक यांनी ओसी मिळवावी अन्यथा गाळे आणि फ्लॅट घेतलेल्या जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी मी आंदोलन करेन. तेव्हा मात्र सुशांत नाईक यांनी लोकांचे पैसे परत करण्याची तयारी ठेवावी. असा इशारा कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिला. सार्वजनिक शौचालयात भ्रष्टाचार झाला असेल तर आम्ही तुमच्यासोबत आहोत. मात्र, सनराइज टॉवर मध्ये भ्रष्टाचार झाला असेल तर तुम्ही आमच्या सोबत राहा असे आवाहन महाविकास आघाडीच्या अन्य सदस्यांना केले.

कणकवली नगरपंचायत मधील भाजपा ची सत्तेची पाच वर्षे काल पूर्ण झाल्यानंतर विरोधी नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्या आरोपांना माजी नगराध्यक्ष समीर नलावडे उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी नगरसेवक संजय कामतेकर अभिजीत मुसळे, विराज भोसले,अजय गांगण आदी उपस्थित होते.

सुशांत नाईक हे बांधकाम व्यवसायात असून सुद्धा आणि त्यांना कोणत्या बांधकामासाठी किती खर्च येतो हे माहीत असून सुद्धा चुकीच्या पद्धतीने आरोप करतात. कारण गेल्या पाच वर्षात आमच्या विरुद्ध बोलण्यासाठी महाविकास आघाडीच्या एकाही नगरसेवकाकडे मुद्दा नाही. एवढे उत्कृष्ट काम आम्ही केलेले आहे. त्यामुळे जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि जनतेच्या मागण्यांना न्याय देण्याचा यशस्वी प्रयत्न गेल्या पाच वर्षात आम्ही केला. सुशांत नाईक यांनी आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यापेक्षा कुडाळ- मालवण मध्ये त्यांचे आमदार असलेले भाऊ, दुसरे चुलत भाऊ,पुतणे असे नाईक कुटुंब ठेकेदारी करून भ्रष्टाचार करत आहे ते पाहावे. कणकवलीतील कामांचा चुकीचा हिशोब मांडू नये तसे झाल्यास त्यांचे आमदार असलेले भाऊ वैभव नाईक यांना वाटेल की कणकवली नगरपंचायतीत खूप मलिदा मिळतो. आणि ते आमदारकी सोडून कणकवली नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्यात येतील असा उपरोधित टोला माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी हाणला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

six + 3 =