You are currently viewing भारतीय व्यापाऱ्यांकडून दिवाळीत चीनला ४० हजार कोटी रुपयांचा दणका….

भारतीय व्यापाऱ्यांकडून दिवाळीत चीनला ४० हजार कोटी रुपयांचा दणका….

नवी दिल्ली :

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) हिंदुस्थानी दिवाळी म्हणून यंदा दिवाळी साजरी करण्यासाठी देशव्यापी तयारी जवळजवळ पूर्ण केली आहे. या वर्षाच्या दिवाळीच्या निमित्ताने कॅटच्या बॅनरखाली देशातील व्यापारी समुदाय चीनला सुमारे 40 हजार कोटी रुपयांचा फटका देण्यास पूर्णपणे तयार आहे. कॅटच्या या मोहिमेला देशभरातील व्यावसायिकांचा पाठिंबा मिळत आहे. एकीकडे व्यापाऱ्यांनी चिनी वस्तूंची विक्री न करण्याचे संकलन केले आहे, तर दुसरीकडे लोक चिनी वस्तू विकत घ्यायलाही तयार नाहीत.

दिवाळीच्या व्यापारात चीनचा वाटा 40 हजार कोटींचा आहे. चिनी साहित्याला पर्यायी वस्तूंची तयारी अगोदरपासूनच संघटनेकडून करण्यात आली आहे. देशभरातील लघू उद्योगांची माहिती एकत्रित करीत साहित्य बनवण्याचे आर्डर देण्यात आले होते.

या औद्योगिक शाखांना अधिक उत्पादन वाढवण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे काम संघटनेकडून केले जात आहे. यासह देशातील प्रत्येक शहरात कारागीर, शिल्पकार तसेच कौशल्यप्राप्त मजुरांशी संपर्क साधत त्यांच्याकडून दिवाळीत विक्री होणाऱ्या उत्पादने बनवून घेतली जात आहेत.

उत्सव काळात ७० हजार कोटींचा व्यापार…

दरवर्षी देशात दिवाळीच्या काळात जवळपास ७० हजार कोटींचा व्यापार होतो. दिवाळी तसेच धनत्रयोदशीला देशवासीय सोने-चांदी तसेच दागिने, ऑटोमोबाईल सारख्या महागड्या साहित्यांची खरेदी करणे शुभ मानतात. यातील जवळपास ७० टक्के म्हणजेच ४० हजार कोटी रुपयांची आयात केवळ चीनमधून होते. जूनमध्ये लडाखच्या गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या हिंसक झटापटीत भारताचे २० जवान शहीद झाले होते. यानंतर देशात चिनी मालावर बहिष्कार घालण्याचा अभियानाने जोर धरला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 − 5 =