You are currently viewing बॅ.नाथ पै शिक्षण संस्थांमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

बॅ.नाथ पै शिक्षण संस्थांमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

कुडाळ :

 

“मानवतेची शिकवण देणारे, दीनदलितांना आत्मसन्मान प्राप्त करून देणारे महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. समाजात सर्वसमावेशक समानता प्रस्थापित केल्या शिवाय सामाजिक सलोखा वाढू शकत नाही. हे जाणून समानतेतून मानवता साधली जाऊ शकते या तत्वाचा पुरस्कार करीत ज्यांनी समाजसेवा केली, अनेक देशांच्या उत्तमोत्तम राज्य घटनांचा अभ्यास करून त्यातून एक सर्वोत्तम अशी लोकशाही वर्धक गाळीव राज्यघटना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केली. अशा घटनेचे शिल्पकार, प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ. आंबेडकर हे भारतभूषण होत.” असे उद्गार प्रा. अरुण मर्गज यांनी काढले. ते बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत होते. त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रज्ञा, शील, करुणाा, शिका व संघटित व्हा या शिकवणी संदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले व त्यातून मानवतेचे, दीन दलितांचे कैवारी असलेल्या डॅॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंचे उपस्थितांना दर्शन घडविले व अभिवादन केले. यावेळी व्यासपीठावर नर्सिंग महाविद्यालयाच्या उपप्राचार्य कल्पना भंडारी, महिला बीएड कॉलेजचे प्रा. नितीन बांबर्डेकर ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य अर्जुन सातोस्कर, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्रा.सुमन करंगळे इत्यादी उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केल्यानंतर आपले विचार व्यक्त करताना प्रा. नितीन बांबर्डेकर यांनी सुद्धा अखिल मानव जातीचा कैवारी महामानव म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. अभ्यासू व कर्तव्यपरायणतेचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉ. आंबेडकर. भारत देशाला अशी महान राज्यघटना ज्यांनी दिली की ज्यातून लोकशाही मूल्यांची जोपासना केली जाते. अशा घटनेचे शिल्पकार म्हणून त्यांचा गौरव करत त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू, त्यांच्या संदर्भातील विविध हृद्य आठवणी सांगितल्या व त्यांच्या आदर्श व थोर व्यक्तिमत्वाची थोरवी उपस्थितांसमोर कथन केली. या अभिवादन कार्यक्रमांमध्ये प्रा.प्रथमेश हरमलकर, प्रा. वैजयंती नर, प्रा. प्रियांका माळकर, प्रा. प्रसाद कानडे व विविध अभ्यासक्रमाचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा