You are currently viewing भाजपा वेंगुर्लेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त “सेवा पंधरवडा” चा शुभारंभ

भाजपा वेंगुर्लेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त “सेवा पंधरवडा” चा शुभारंभ

वेंगुर्ला :

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यावर प्रथम अभियान राबवीले ते म्हणजे “स्वच्छ भारत मिशन”.  हया मिशन अंतर्गत घरोघरी शौचालये, कचरा मुक्त शहर असे उपक्रम राबवुन जनतेपर्यंत स्वच्छतेचे महत्व पटविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात आपला परीसर स्वच्छ असला पाहिजे ही भावना निर्माण करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोलाचा वाटा आहे. म्हणुनच वेंगुर्ले तालुक्यात त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे आवडते “स्वच्छता अभियान” आयोजित करुन “सेवा पंधरवडा” कार्यक्रमाचा शुभारंभ केला.

यावेळी जिल्हा सरचिटणीस तथा सेवा पंधरवडा जिल्हा संयोजक प्रसंन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर, नगराध्यक्ष राजन गीरप, जिल्हा उपाध्यक्ष अॅड सुषमा खानोलकर, उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर, मच्छीमार सेलचे दादा केळुसकर, जिल्हा का का सदस्य वसंत तांडेल, ता. सरचिटणीस बाबली वायंगणकर, शहर अध्यक्ष सुरेंद्र चव्हाण, नगरसेवक प्रशांत आपटे, नगरसेवक नागेश उर्फ पींटू गावडे, नगरसेविका साक्षी पेडणेकर व ईशा मोंडकर, महिला शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर, महिला मोर्चाच्या रसीका मठकर, लायनेस क्लबच्या उर्मिला सावंत, ता. उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस, उभादांडा शक्ती केंद्र प्रमुख निलेश मांजरेकर, युवा मोर्चाचे पिंटु सावंत, भुषण सारंग, अमेय धुरी, बुथप्रमुख सुधीर पालयेकर, बुथप्रमुख बाबुराव मेस्त्री, बुथप्रमुख वेंगुर्लेकर, बुथप्रमुख पुंडलिक हळदणकर, अशोक खराडे, सुधाकर वेंगुर्लेकर, रामचंद्र आरावांदेकर, देविदास मोठे, निलेश खडपकर, श्रीकांत तांडेल, अजय आरोलकर, फारुक हुसेन इत्यादी भाजपा कार्यकर्ते तसेच मच्छीमार बांधव या स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा