You are currently viewing कणकवली दिव्यांग संगीता पाटील यांचा सत्कार

कणकवली दिव्यांग संगीता पाटील यांचा सत्कार

कणकवली :

महिला उत्कर्ष समिती महाराष्ट्र तर्फे समितीच्या प्रदेश कार्याध्यक्ष श्रुतीताई उरणकर यांच्या हस्ते कणकवली तालुक्यातील दिव्यांग संगीता पाटील यांचा त्यांचं सामाजिक कार्यातील योगदान पाहून शाल,श्रीफळ,गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

संगीता पाटील यांचे कार्य महान असून त्यांचा आदर्श आज सर्वांनी घेणे जरुरी आहे असे मत श्रुती ताई उरणकर यांनी येथे बोलताना केले.

त्याचबरोबर पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्राच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सप्त ज्योती म्हणून पनवेल येथे त्यांचा सत्कार केला जाणार आहे.

संगीता पाटील यांनी दिव्यांग महासंघाचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे आणि त्या आजही एकता दिव्यांग संस्थेमध्ये दिव्यांगांसाठी काम करत आहेत. दिव्यांगांसाठी शासनाच्या वेगवेगळ्या योजना प्राप्त करून देत आहेत.त्याचबरोबर कोरोना काळामध्ये दिव्यांगाना कामात सूट असूनही कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी जीवाची पर्वा न करता त्यांनी काम केलं आहे. त्यावेळी टीव्ही 9, एबीपी माझा वर त्यांची खास मुलाखत घेण्यात आली होती.त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रतिष्ठानांकडून त्यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला होता.या त्यांच्या कामाची दखल महिला उत्कर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेऊन त्यांचं आदरातिथ्य करून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला उपस्थित महिला उत्कर्ष समितीच्या सिंधुदुर्गच्या अध्यक्षा ज्योतिका हरयाण, सचिव सुप्रिया पाटील, सदस्य दुर्वा मानकर,स्वरदा खांडेकर,नेहा कोळंबकर चंद्रकला चंद्रमोहन मानकर आदि महिला वर्ग उपस्थित होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा