You are currently viewing महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 (टी.ई.टी) उत्तीर्ण उमेदवारांनी प्रमाणपत्र घेण्यासाठी  उपस्थित राहवे

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 (टी.ई.टी) उत्तीर्ण उमेदवारांनी प्रमाणपत्र घेण्यासाठी  उपस्थित राहवे

– शिक्षणाधिकारी ( प्राथमिक) महेश धोत्रे

सिंधुदुर्गनगरी

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 (टी.ई.टी) उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी प्रमाणपत्र शिक्षण विभाग (प्राथमिक)  जिल्हा परिषद यांच्याकडे उपलब्ध आहेत. सदर उमेदवारांनी पुढीलप्रमाणे कागदपत्रे घेवून  प्रमाणपत्र घेण्यासाठी  उपस्थित राहवे, असे आवाहन शिक्षणाधिकारी ( प्राथमिक)  महेश धोत्रे यांनी केले आहे.  

            आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र प्रत. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा गुणपत्रिका प्रत. डी.टी.एड उत्तीर्ण गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र अथवा बी.एङ उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक. आरक्षण प्रवर्गाजे जात प्रमाणपत्र. दिव्यांगात्वाचे प्रमाणपत्र. माजी सैनिक उसल्सास त्याबाबतचा पुरावा. ओळखपत्र (आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्राइव्हिंग लाईसन्स, निवडणूक ओळखपत्र इ.)

         महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे-1 यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 (MAHATET 2021) पेपर क्र.1 व पेपर क्र.2चा अंतिम निकाल दिनांक 23 डिसेंबर 2022 रोजी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने जाहिर करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 − 1 =