You are currently viewing भाजपाच्या सोशल मिडीया, आय् .टी.सेल, ॲप संयोजक, वैद्यकीय आघाडी व दिंव्यांग आघाडीची संयुक्त बैठक संपन्न

भाजपाच्या सोशल मिडीया, आय् .टी.सेल, ॲप संयोजक, वैद्यकीय आघाडी व दिंव्यांग आघाडीची संयुक्त बैठक संपन्न

भाजपा वैद्यकिय आघाडीचे प्रदेश सहसंयोजक डाॅ. अमेय देसाई यांचे मार्गदर्शन

भाजपा मध्ये सोशल मिडीयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने सात वर्षात घेतलेले जनकल्याणकारी निर्णय सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी सोशल मिडीयाची महत्त्वाची भुमिका आहे असे प्रतिपादन भाजपा वैद्यकिय आघाडी प्रदेश सहसंयोजक डाॅ अमेय देसाई यांनी केले .
भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात सोशल मिडीया , आय्. टी.सेल , अॅप संयोजक , वैद्यकीय आघाडी व दिंव्यांग आघाडी ची संयुक्तिक बैठक आयोजित केली होती . यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण , जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , नगराध्यक्ष राजन गिरप , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , आय्. टी.सेलचे केशव नवाथे , वैद्यकीय आघाडी चे डाॅ. गुरुनाथ गणपत्ये , दिव्यांग आघाडीचे अनिल शिंगाडे , सोशल मिडीयाचे विष्णू परब – अमेय धुरी , अॅप संयोजक योगेश घाडी , सावंतवाडी मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे , सावंतवाडी सोशल मिडीयाचे केतन आजगावकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी आय्. टी.सेलचे केशव नवाथे यांनी पक्षाच्या पोर्टल बाबत माहिती दिली .तसेच आय्. सेलच्या माध्यमातून कशाप्रकारे पक्षाचे काम सुरु आहे याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले . तसेच भाजपा दिंव्यांग विकास आघाडीचे जिल्हा संयोजक अनील शिंगाडे यांनी आतापर्यंत दिव्यांगासाठी घेतलेल्या उपक्रमांची माहिती दिली .तसेच दिंव्यांगांसाठी भविष्यात विविध उपक्रम आयोजित करणार असल्याचे सांगितले .
*वैद्यकीय आघाडी च्या माध्यमातून आरोग्य शिबीर* ——- सिंधुदुर्गातील ग्रामीण भागात ज्याठीकाणी तज्ञ डाॅक्टर उपलब्ध नसतात जिल्ह्याबाहेरील तज्ञ डाॅक्टर आणुन वैद्यकीय शिबिरे घेण्याचा मनोदय वैद्यकीय आघाडी चे डाॅ. अमेय देसाई व डाॅ. गणपत्ये यांनी व्यक्त केला.तसेच सोशल मिडीया च्या माध्यमातून प्रत्येक बुथचा वाॅट्सअॅप ग्रुप बनवुन प्रत्येक ग्रुप मध्ये २५० लोकांना सहभागी करून घेण्याचे मार्गदर्शन करण्यात आले .


यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अॅड. सुषमा खानोलकर व सोमनाथ टोमके , मच्छिमार सेलचे दादा केळुसकर , जि.का.का.सदस्य वसंत तांडेल , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर व प्रशांत खानोलकर , नगरसेवक प्रशांत आपटे , ता.चिटनीस समीर चिंदरकर , महिला मोर्चा च्या रसीका मठकर व वृंदा मोर्डेकर , युवा मोर्चा चे प्रणव वायंगणकर , ओबीसी सेलचे शरद मेस्त्री , किसान मोर्चा चे बाळु प्रभु , दिव्यांग आघाडीचे शामसुंदर लोट – सदानंद पावले – विजय कदम , संतोष खानोलकर , ओंकार चव्हाण , दिवाकर कुर्लै इत्यादी उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × five =