You are currently viewing वैभववाडी कुसूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

वैभववाडी कुसूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

वैभववाडी

बिबट्याच्या हल्यात कुसूर सुतारवाडी येथील प्रवीण शिवाजी तावडे यांच्या मालकीचे वासरू मृत्युमुखी पडले. यात त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी प्रवीण तावडे यांनी आपली जनावरे घराशेजारील गोठ्यात बांधली होती. रात्रीच्यावेळी बिबट्याने गोठ्यातील वासरावर हल्ला चढवून ठार केले आहे. या घटनेची माहिती तावडे यांनी वनविभागाला दिली. वैभववाडीचे वनपाल सदाशिव वागरे, वनरक्षक श्री. काकतिकर यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला आहे. संबंधित शेतकरी यांनी नुकसानभरपाई मिळवून दिली जाईल, असे आश्वासन श्री वागरे यांनी दिले आहे. कूसुर परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा