You are currently viewing कणकवली पं. स. उपसभापती प्रकाश पारकर यांच्या प्रयत्नांना यश..

कणकवली पं. स. उपसभापती प्रकाश पारकर यांच्या प्रयत्नांना यश..

कासार्डे देऊळवाडीतील जीर्ण वीजपोल बदलास सुरुवात..

कणकवली :

कणकवली मधील कासार्डे गावातील देऊळवाडी भागातील विजपोल जीर्ण झाले होते. या संदर्भात पं. स. उपसभापती प्रकाश पारकर यांच्याकडे नवीन विजपोल बसवून मिळावेत अशी मागणी सातत्याने स्थानिक ग्रामस्थ करत होते. ग्रामस्थांच्या मागणीचा पारकर यांनी वीजवितरण विभागाकडे सतत पाठपुरावा करून दिला. त्यामुळे कासार्डे देऊळवाडी भागातील जीर्ण विजपोल बदलण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

कणकवली पं. स. उपसभापती यांनी विजवीतरण विभागाकडे यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर देऊळवाडीतील जीर्ण विजपोल बदलून नवीन वीजपोल बसविण्यास विजवीतरण कंपनी कडून सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ समाधान व्यक्त करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × four =