संकेश्वर बांदा हा महामार्ग सावंतवाडीतून जाण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांकडुन निधी आणू…

संकेश्वर बांदा हा महामार्ग सावंतवाडीतून जाण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांकडुन निधी आणू…

– आ. दिपक केसरकर

सावंतवाडी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी माझे आज ही चांगले संबंध आहेत. त्यामुळे संकेश्वर बांदा हा महामार्ग सावंतवाडी शहरातील रिंगरोडवरुन जाण्यासाठी आवश्यक असलेला निधी मी त्यांच्याकडुन नक्कीच मागून घेईन, असा विश्वास माजी पालकमंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांनी येथे व्यक्त केला.
या महामार्गासाठी बुर्डी पुला पर्यत सर्व्हेक्षण झाले,असून त्याचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. हा महामार्ग शहराच्या रिंगरोडवरून जावा यासाठी आमचे प्रयत्न आहेत.त्यासाठी येणारा खर्च राष्ट्रीय महामार्गाने करावा,असा प्रस्ताव तयार केला आहे.यासाठी आवश्यक असलेली मंजूरी श्री पवार देतील असा आपल्याला विश्वास आहे असेही ते म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा