गावराई व हळवल येथील शिवजयंती उत्सवास आ.वैभव नाईक यांनी दिली भेट

गावराई व हळवल येथील शिवजयंती उत्सवास आ.वैभव नाईक यांनी दिली भेट

सिंधुदूर्ग :

गावराई गडकरवाडी येथे आई भवानी तरुण मित्रमंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सवास कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी छ.शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन केले. मंडळाच्या वतीने आ.वैभव नाईक यांचा  शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.त्याचबरोबर हळवल येथे शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सवास आ. वैभव नाईक यांनी भेट देऊन छ.शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

यावेळी गावराई येथे अवधूत मालणकर, छोटू पारकर, सुनील जाधव, सागर वाईरकर, सतीश राऊत, महादेव राऊत, राजू परुळेकर मंदार दामोदर, दिलीप राऊत, आदिंसह ग्रामस्थ व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

तर हळवल येथे शिवसेना नेते संदेश पारकर, उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, भास्कर राणे, राजू राणे, दामू सावंत आदिंसह हळवल येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा