You are currently viewing बॅडमिंटन स्पर्धेत साक्षी रावराणेचे यश

बॅडमिंटन स्पर्धेत साक्षी रावराणेचे यश

वैभववाडी

रत्नागिरी- देवरुख कॉलेज येथे झालेल्या विभाग स्तरीय (सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड ) अंतर
महविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील मुलींच्या संघामधून *साक्षी जयवंत रावराणे* हिची महिला एकेरी मधून मुंबई विद्यापीठ स्तरावर निवड झाली आहे. ही स्पर्धा मुंबई विद्यापीठ अंतर्गत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या ग्रामीण विभागासाठी आयोजित केली होती. स्पर्धेत इतर महाविद्यालयातून मुलांचे अठरा तर मुलींचे बारा संघ सहभागी झाले होते. आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाच्या मुलांच्या संघामधून सर्वेश सोमन, चेतन पेडणेकर, ओंकार माईणकर, रोहित चव्हाण, सुरज टक्के, तेजस पवार व मुलींच्या संघातून श्वेता सावंत, साक्षी रावराणे, आशा पाटील, प्रज्ञा कोलते, भाग्यश्री पांचाळ यांनी सहभाग नोंदवला होता. त्यामधून साक्षी रावराणे हिची मुंबई विद्यापीठ स्तरावरती निवड झाली आहे. प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे, क्रीडा प्रशिक्षक अशोक पाटील, क्रीडा विभाग प्रमुख प्रा.एस. बी. पाटील व सदस्य अधीक्षक संजय रावराणे यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयातील संस्था पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा