You are currently viewing निदान नगरपरीषद निवडणुक लागेपर्यंत तरी तक्रारीविना सर्वांची साथ मिळेल – सामाजिक कार्यकर्ते विवेक कुबल 

निदान नगरपरीषद निवडणुक लागेपर्यंत तरी तक्रारीविना सर्वांची साथ मिळेल – सामाजिक कार्यकर्ते विवेक कुबल 

वेंगुर्ला नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांचे अभिनंदन

वेंगुर्ले

शहरसौदयों करणात राज्यात प्रथम क्रमांक पटकाविलेल्या व १५ कोटीचे बक्षिस मिळविलेल्या वेंगुर्ले नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांचे अभिनंदन नगरातील माजी नगराध्यक्षांसह माजी नगरसेवक तसेच विविध संघटना आणि नागरिकांतून होत आहे हि बाब वेंगुर्ले वासियांसाठी अभिमानास्पद व यापेक्षाही चांगल्या प्रकारचे काम करण्यास प्रोत्साहन देणारी आहे. अशा सर्वांच्या शुभेच्छामुळे नगरपरीषदेच्या निवडणुका लागेपर्यंत तरी तक्रारीविना सर्वांची साथ मिळेल अशी प्रतिक्रीया सामाजिक कार्यकर्ते विवेक कुबल यांनी व्यक्त केली आहे.

वेंगुर्ले नगरपरिषदेस या पूर्वीही देश राज्य, कोकण विभाग व जिल्हातरावरील स्वच्छतेची बक्षिसे मिळाली. त्यासाठी सर्व प्रथम अपार कष्ट घेणारे तत्कालीन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव राज्यातून झाला. कारण तो पहिलाच स्वच्छतेच्या स्पर्धेचा विषय होता व त्यासाठी त्यांनी नागरीक व सर्व काकौन्सिल सदस्यांना विश्वासात घेत केलेले परीश्रम हे महत्वाचे होते. त्यामुळे त्यांचे अभिनंदन सर्वात जास्त होणे अपेक्षित होते. पण त्यावेळी नगराध्यक्षांचा कारभार असल्याने आता प्रमाणे माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक, संघटना यांच्याकडून सत्कार झाला नव्हता. खरे म्हणजे त्यांनी केलेल्या स्वच्छतेच्या कामातून त्यांयच काळात एकूण सुमारे ३० कोटी रूपयांचा वेंगुर्ले शहरास मिळाला होता. पण विद्यमान मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांचा ४ ते ५ महिन्यात झालेल्या एट्रीत व त्यांनी केलेल्या शहर सौदर्यीकरण्याच्या केलेल्या कामामुळे वेंगुर्ले शहरास राज्यात प्रथम क्रमांकासह १५ कोटिं रूपयांचे बक्षिस निधी मिळाला यासाठी त्यांना भाग्यवान म्हटल्यास वावगे ठरू नये.
गेल्या सुमारे ५ महिन्यात विद्यमान मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी, वेंगुर्ले नगर परिषदेने केलेल्या विविध विकास कामांवर तसेच स्वच्छतेच्या कामांवर विशेष लक्ष देत कामे करण्यास सुरवात केली. या कामांबाबत माजी नगराध्यक्ष, तसेच माजी नगरसेवक व नागरीक यांनी केलेल्या सुचनांप्रमाणे कामेही सुरू केली. त्यांची काम करण्याची पध्दत लक्षात घेत कौन्सिल कार्यरत नसतानाही कौन्सिलची कमतरता ते भासू देत नाहीत. नागरीकांना सेवा देण्यासाठी सफाई कामगारांपासून ते प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहभागाने स्वच्छतेसह सुरू ठेवलेली कामे पहाता येत्या कांही कालावधीत नागरीकांना अपेक्षित कामे होऊ शकतील, त्यामुळे वेंगुर्ले नगरपरीषद देशांत अव्वल करण्यासाठीचे प्रयत्न ते करीत असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे नागरीकांतूनही नुतन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांचेबाबत आदर निर्माण झालेला आहे. असेही सामाजिक कार्यकर्ते विवेक कुबल यांनी स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा