You are currently viewing दहावीच्या निकालात कोकण विभागाची बाजी

दहावीच्या निकालात कोकण विभागाची बाजी

कोकण विभागाचा निकाल ९८.११ टक्के तर राज्याचा निकाल ९३.८४ टक्के

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत ९३.८४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या निकालात कोकण विभागाचा निकाल ९८.११ सर्वाधिक टक्के, तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा ९२.०५ टक्के जाहीर झाला आहे.

या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५,४९,६६६ निमित नोंदणी केली होती. त्यापैकी १५,२९,०९६ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १४,३४,८९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.८३ आहे. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण ३०,००४ पुनर्परिक्षार्थी नोंदणी केली होती. त्यापैकी ३६,६४८ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी २२,३२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णची ६०.९० आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा