You are currently viewing आंबोली रस्त्यावर असलेली अनधिकृत बांधकामे, हॉटेल तात्काळ पाडून टाका – अमित परब

आंबोली रस्त्यावर असलेली अनधिकृत बांधकामे, हॉटेल तात्काळ पाडून टाका – अमित परब

आंबोली रस्त्यावर असलेली अनधिकृत बांधकामे, हॉटेल तात्काळ पाडून टाका – अमित परब

अन्यथा कार्यालयासमोर उपोषण करणार, बांधकाम विभागाला इशारा…

सावंतवाडी

आंबोली घाटापासून आजरा फाट्यापर्यंत मुख्य रस्त्याच्या बाजूला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत असलेली सर्व अनधिकृत बांधकामे, हॉटेल ४८ तासात पाडून टाकण्यात यावीत, अन्यथा बांधकाम कार्यालयासमोर आंदोलन करू, असा इशारा भाजपाचे पदाधिकारी अमित परब यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांना निवेदन दिले आहे.
यात बांधकाम खात्याच्या जमिनीत आंबोली ते आजरा फाट्यापर्यंत अनेक अनधिकृत बांधकामे उभारण्यात आली आहे. ती वाहतूकीस अडथळा ठरत आहेत. त्यामुळे ती तात्काळ पाडून टाकण्यात यावीत, अन्यथा सावंतवाडी येथील कार्यालयासमोर आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 3 =