You are currently viewing निवृत्तवेतनधारक,  कुटुंब निवृत्तवेतनधारकांना हयातीचे प्रमाणपत्र 30 नोव्हेंबरपर्यंत सादर करावे

निवृत्तवेतनधारक,  कुटुंब निवृत्तवेतनधारकांना हयातीचे प्रमाणपत्र 30 नोव्हेंबरपर्यंत सादर करावे

निवृत्तवेतनधारक,  कुटुंब निवृत्तवेतनधारकांना हयातीचे प्रमाणपत्र 30 नोव्हेंबरपर्यंत सादर करावे

सिंधुदुर्गनगरी

निवृत्तवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तवेतनधारक यांनी दि. 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत हयात प्रमाणपत्र संबंधित बँकेकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. शिवप्रसाद खोत यांनी केले.

            सर्व निवृत्तवेतनधारक व कुटुंबनिवृत्तवेतनधारक यांच्या नावाची यादी संबंधित बँकांकडे पाठविण्यात आलेली आहे. त्या यादीमधील आपल्या नावासमोर स्वाक्षरी करण्यात यावी.  राज्य शासकीय निवृत्तवेतनधारक व कुटुंबनिवृत्तवेतनधारक यांनी आपले हयाचे प्रमाणपत्र निवृत्तवेतन घेत असलेल्या बँकेमध्ये सादर करणे आवश्यक आहे. हयातीच्या दाखल्यासोबत सध्याचा भ्रमणध्वनी क्रमांक, पॅनकार्ड क्रमांक व आधारककार्ड क्रमांक आदी माहिती सादर करावयाची आहे. शिवाय निवृत्तवेतनधारक व कुटुंबनिवृत्तवेतनधारक यांनी पुन:श्च शासनामध्ये कोणत्याही प्राधिकरणात सेवा स्विकारली नाही, तसेच पुर्नविवाह केलेला नाही. याबाबतची माहिती संबंधित बँकांकडे सादर करणे आवश्यक आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा