You are currently viewing संगिता कुबल दि प्राईड ऑफ महाराष्ट्र एमजेएफ अवॉर्ड‘ ने सन्मानीत

संगिता कुबल दि प्राईड ऑफ महाराष्ट्र एमजेएफ अवॉर्ड‘ ने सन्मानीत

वेंगुर्ला

नवी मुंबई येथील महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशन या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नावाजलेल्या संस्थेतर्फे वेंगुर्ला नगरपरिषदेच्याा प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल यांना ‘दि प्राईड ऑफ महाराष्ट्र एमजेएफ अवॉर्ड‘ देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार वितरण सोहळा ३० ऑक्टोबर रोजी विष्णूदास भावे नाट्यगृह वाशी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

संगिता कुबल यांनी गेल्या कित्येक वर्षात केलेल्या विधायक क्षेत्रातील गौरवपूर्ण कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली होती. त्यांच्या समाजहितैषी कार्याची ओळख समाजाला व्हावी, त्याद्वारे समाजघटकांना प्रेरणा मिळावी व सौ. कुबल यांना भविष्यातही अधिक जोमाने कार्य करण्याचे बळ मिळावे हा पुरस्कार देण्यामागे हेतू होता.
हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संगिता कुबल यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − eleven =