You are currently viewing अखेर दिवाळी सुट्टी कमी करणारा निर्णय मागे

अखेर दिवाळी सुट्टी कमी करणारा निर्णय मागे

20 नोव्हेंबरपर्यंत सुट्टी जाहीर

शिक्षक भारतीच्या आंदोलनाचे यश

दिवाळीची सुट्टी कमी करणाऱ्या आणि 50 टक्के उपस्थिती बंधनकारक करणाऱ्या शासन निर्णयांची शिक्षक भारतीने केली होळी

तळेरे

दिवाळी सुट्टी कमी करणारा निर्णय अखेर शिक्षण विभागाने मागे घेतला आहे. 20 नोव्हेंबर पर्यंत सुट्टी जाहीर केलीय. 5 दिवसांची दिवाळी सुट्टी जाहीर केल्याचा निर्णय काल शिक्षण विभागाने जाहीर केला होता. त्याला शिक्षक भारती आणि आमदार कपिल पाटील यांनी कडाडून विरोध केला होता. शिक्षक भारतीने राज्यभर या निर्णयाची होळी केली. आमदार कपिल पाटील यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन वस्तुस्थिती त्यांच्या लक्षात आणून दिली. अखेर शिक्षण विभागाने दिवाळी सुट्टी कमी करणारा निर्णय मागे घेऊन 20 नोव्हेंबरपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे व राज्य प्रमुख कार्यवाहक तथा जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी दिली आहे.
5 नोव्हेंबर 2020 आणि 29 ऑक्टोबर 2020 रोजी शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या निर्णयांची शिक्षक भारतीच्या वतीने आज राज्यभर होळी करण्यात आली. शाळा संहितेनुसार शैक्षणिक वर्षात शिक्षकांना 76 सुट्ट्या घेण्याचा अधिकार दिलेला आहे. दरवर्षी शिक्षकांना 18 दिवसाची दिवाळीची सुट्टी दिली जाते. कोरोनाचे कारण पुढे करून आणि बालदिन सप्ताहासाठी शिक्षण विभागाने या वर्षी केवळ पाच दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. यासाठी शिक्षक भारतीने निषेध केला आहे, असं शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी सांगितलं.

मार्च महिन्यामध्ये लाॅकडाऊन जाहीर झाल्यापासून शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी कोविड ड्युटी करत आहेत. ऑनलाईन शिक्षण देण्याचे काम करत आहेत. मे महिन्यामध्ये लाॅकडाऊनमुळे शिक्षकांना कर्मचाऱ्यांना स्वतःच्या गावी सुद्धा जाता आलेले नाही. 15 जून पासून नियमितपणे ऑनलाईन शिक्षण देण्याचे कार्य सुरू आहे. तसेच विद्यार्थ्यांना तासनतास ऑनलाईन शिक्षणासाठी बसून राहावे लागत आहे. बालकांच्या मानसिक स्थितीचा विचार करून दिवाळीची सुट्टी देणे आवश्यक आहे, अशी शिक्षक भारतीची भूमिका आहे.

या सर्व गोष्टींचा विचार करून शिक्षण विभागाने 18 दिवसांची सुट्टी जाहीर करणे अपेक्षित होते परंतु तसे न करता केवळ पाच दिवस सुट्टी देण्यात आली आहे. तसेच ट्रेनमधून प्रवास करण्यास शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बंदी असतानाही 50 टक्के उपस्थितीचा शासन निर्णय काढला गेलेला आहे. या दोन्ही अन्यायकारक शासन निर्णयांची होळी शिक्षक भारतीच्या वतीने करण्यात आली.

*सिंधुदुर्गात शासन निर्णयाची होळी!*

सिंदुर्गातून शिक्षक भारतीचे राज्य प्रमूख कार्यवाह तथा जिल्हाध्यक्ष संजय वेतूरेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष संदीप कदम कास्ट्राईब जिल्हाध्यक्ष, सी डी चव्हाण,- राज्य प्रतिनिधी माणिक पवार माणिक खोत ,मारुती सांगळे, संजय पवार ,केशव ठाकरे, सुभाष विनकर, अनिकेत वेतुरेकर ,महादेव सातपुते, आशिष राठोड, भास्कर पारधी,
सावंतवाडी -अनंत सावंत सुष्मिता चव्हाण, अरविंद मेस्त्री दोडामार्ग- शरद देसाई मालवण -महेंद्र वारंग, संजय जाधव ,देवगड- हेमंत सावंत लाडगावकर वैभववाडी- स्वप्नील पाटील, श्री.घावरे वेंगुर्ला- जय श्रीराम, जयेश राऊळ याच्यासह अन्य कार्यकर्त्यानी जिल्ह्रात विविध ठिकाणी या अन्यायकारक शासन निर्णयाची कार्यकर्त्यांनी होळी करीत निषेध नोंदविला. तर मुंबईत शिक्षक भारतीचे प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे यांच्या नेतृत्वात भटवाडी घाटकोपर येथे आणि कामगार मैदान परळ येथे या विद्यार्थी आणि शिक्षक विरोधी शासन निर्णयांची होळी करण्यात आली. यावेळी राधिका महांकाळ, विजय गवांदे, कैलास गुंजाळ, अशोक शिंदे, वसंत उंबरे, रवी कांबळे, रश्मी मोरे आदींचा सहभाग होता.

मुलुंड येथे शिक्षक भारती महिला आघाडी अध्यक्षा संगिता पाटील यांच्या नेतृत्वात या निर्णयांची होळी करण्यात आली. यावेळी अनिता बुरसे, वंदना कोल्हे आणि शिक्षक उपस्थित होते.
राज्यभर शिक्षकांनी शिक्षक भारतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत उत्स्फूर्तपणे आंदोलन छेडत अखेर शासनाला निर्णयात बदल करण्यास भाग पाडले.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 1 =