You are currently viewing गणेशोत्सवासाठी रेल्वे तिकिटाचे बुकिंग १७ मे पासून सुरू होणार

गणेशोत्सवासाठी रेल्वे तिकिटाचे बुकिंग १७ मे पासून सुरू होणार

*गणेशोत्सवासाठी रेल्वे तिकिटाचे बुकिंग १७ मे पासून सुरू होणार*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : यावर्षी १९ सप्टेंबरला श्री गणेश चतुर्थी आहे. या दिवसापासून साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवासाठी आपल्या मूळ गावी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदा रेल्वे तिकिटाचे बुकिंग १७ मे पासून आगाऊ पद्धतीने सुरू होणार आहे.
कोकणात मोठ्या प्रमाणात होळीसह गणेशोत्सव साजरा केला जातो. घरोघरी श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना होते. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही १९ सप्टेंबर पासून गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. दीड, पाच, सात, नऊ किंवा अकरा दिवसांमध्ये साजरा होणाऱ्या या गणेशोत्सवासाठी प्रत्येक घरामध्ये मुंबई, पुणे येथून चाकरमानी येत असतात. त्यामुळे त्यांना प्रवासाचे नियोजन आगावू करावे लागते. यंदा १९ सप्टेंबरला श्री गणेश चतुर्थी असली तरी पूर्व तयारीसाठी अनेकजण गावाकडे येणार आहेत. यासाठी रेल्वे बुकिंगचे आतापासूनच नियोजन केले जात आहे.

येत्या १७ मे पासून १४ सप्टेंबर करिता, १८ मे रोजी १५ सप्टेंबर करिता आरक्षण करता येणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी चार जूनला २ ऑक्टोबरचे बुकिंग होणार आहे. नियमित गाड्यांबरोबर जादा गाड्या यावेळी सोडल्या जातात. त्यामुळे सध्या तरी कोकण रेल्वे मार्गावर नियमित धावणाऱ्या गाड्यांसाठी १७ मे पासून गणेशोत्सवासाठी आगाऊ आरक्षण उपलब्ध होणार आहे. गौरी-गणपती उत्सवासाठी येणाऱ्या भाविकांसाठी १२० दिवसांचे हे आगाऊ आरक्षण करावे लागणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा