You are currently viewing जिल्ह्यात जुगाराच्या बैठकांना पेव…

जिल्ह्यात जुगाराच्या बैठकांना पेव…

*जिल्ह्यात जुगाराच्या बैठकांना पेव…*

*पोईप मसुरे बीच, रेडी कनयाळ, नानेली माणगाव येथे बैठकांचे फड*

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी खुलेआम जुगाराच्या बैठकांच्या मैफीली रंगत आहेत. जिल्ह्यातील खाकी वर्दीचा आशीर्वाद लाभल्याने जुगाऱ्यांना रान मोकळे झाले आहे. चिल्लर पैशांच्या मोहापायी आपले इमान विकून खाकी वर्दीचे काही शिलेदार हात ओले करून घेत आहेत, आणि जुगारी तक्षिमदार मात्र गलेलठ्ठ पैसा गोळा करत आहेत.
मागील सहा महिने मालवण तालुक्यातील थट्टा परिसरात अधून मधून जागा बदलून जुगार बैठका बसत आहेत. पोईप मसुरे परिसरातील आना टेरकर इथे जुगाराच्या बैठका बसवतो. सायंकाळी ४ ते ७ वाजेपर्यंत पोईप धरणावर मोठी बैठक बसते. यात बडे जुगारी सामील असतात अन् केवळ तीन तासात लाखोंची उलाढाल होते.
वेंगुर्ला तालुक्यातील गणपती मंदिर व खनिज खाण व्यवसायासाठी प्रसिद्ध असलेल्या गावात दोन बैठका बसतात. सातोसेचा सक्क्या आणि नागोळेचा मंजू हे दोघे या बैठका बसवतात. तेथील बीट अंमलदाराच्या आशीर्वादाने कनयाळ केळ्यासाठी प्रसिद्ध नाव असलेल्या गावात सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत जुगार मैफिल रंगत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
कुडाळ तालुक्यातील माणगाव येथे क्रिकेट सामन्यांच्या आणि दशावतारी नाटकाच्या आडून जुगाराचे फड रंगतात. “का”नेली येथील गवताच्या गंजी मागे मोठा जुगार चालतो. परंतु तेथील बीट अंमलदार नक्की काय करतात..? हे समजणे मुश्किल झाले आहे.
सिंधुदुर्गातील जुगार्यांच्या अवैध्य धंद्याला खाकी कधी आणि कुठे पर्यंत सहकार्य करणार? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे, परंतु जिल्हा पोलीस अधीक्षक मात्र या विरुद्ध काहीही पाऊल उचलताना दिसत नाहीत यामागील गौडबंगाल काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

*संवाद मीडिया*

*📢 बुकिंग सुरु….बुकिंग सुरु…बुकिंग सुरु..*📣

*🔹गणेश बाग रेसिडेन्सी*🔹

*⚜️व्हि.एस.पी. रिअलटर्स अँड इंफ्रास्ट्रक्चर्स*⚜️

*कलेक्टर मंजूर…👇*
https://sanwadmedia.com/129656/

*🏬निवासी बंगलो प्लॉट व रेडी बंगलो लेआऊट*🏡🏘️🏘️

*🏠 3 BHK बंगलो उपलब्ध*🏡

*▪️पथ दिवे ▪️ मुबलक पाणी ▪️ प्रशस्त अंतर्गत रस्ते▪️ प्लॅट च्या किंमती मध्ये स्वतंत्र बंगला▪️ प्रत्येक चाकरमन्याच्या मनातील गावाकडील घर*

*बुकिंग संपर्क :*👇
*📲 7038800789*
*📲 8983092326*

*देवरुख एस. टी. स्टॅंड पासून फक्त १.० कि. मी. अंतरात*

*साईट : मु. पो. गणेश बाग, ओझरे खुर्द,*
*देवरूख, संगमेश्वर, रत्नागिरी*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/129656/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा