You are currently viewing एसटी बस मध्ये चढताना पर्स मधील १२ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास.

एसटी बस मध्ये चढताना पर्स मधील १२ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास.

कणकवली :

बस मध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने विवाहितेच्या पर्समधील १२ लाख रुपये किमतीचे २१ तोळ्याचे दागिने लंपास केले. दागिने चोरीची घटना सोमवारी दुपारी १२ वाजून ३० मिनिटाच्या सुमारास कणकवली – लातूर एसटी बस प्लॅटफॉर्मवरअसताना घडली.

याबाबत सुचिता सूर्यकांत कदम (५८ राहणार सांताक्रुज- मूळ राहणार कुर्ली. ता – वैभववाडी ) यांनी कणकवली पोलिसात फिर्याड दाखल केली आहे. चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये ८ तोळ्याचे पेंडल मंगळसूत्र, ३ तोळ्याची रुद्राक्ष सोन्याची माळ , प्रत्येकी एक तोळ्याच्या काळा, पिवळा व लाल रंगाच्या पावळण्याच्या सोन्याच्या अंगठ्या, ३ तोळ्याच्या बांगड्या, याचा समावेश होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two + 18 =