You are currently viewing शेतकरी सहकारी संघ निवडणुकीत भाजप व बाळासाहेबांची शिवसेना चे सर्व उमेदवार विजयी

शेतकरी सहकारी संघ निवडणुकीत भाजप व बाळासाहेबांची शिवसेना चे सर्व उमेदवार विजयी

सोपवलेली जबाबदारी यशस्वी केल्याबद्दल आ. नितेश राणे यांनी केले अजित नाडकर्णी यांचे अभिनंदन.

कणकवली

कणकवली शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाची आज निवडणूक झाली. त्‍यानंतर लगेचच मतमोजणी करण्यात आली. यात सर्व १४ जागांवर भाजपचे उमेदवार मताधिक्‍याने विजयी झाले. तर शिवसेनेला एकही जागा मिळू शकली नाही.
खरेदी विक्री संघ निवडणूकीसाठी आज सकाळी पासूनच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. आमदार नीतेश राणे यांनी देखील रांगेमध्ये राहून मतदान केले. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षांमध्येही थेट लढत होती.

आमदार मा.नितेशजी राणे यांनी या निवडणुकीकडे विषेश लक्ष दिले होते. सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी सर्व सीट निवडून आणेन अशी ग्वाही आमदार नितेश राणे यांना दिली होती. त्याप्रमाणे आज झालेल्या निवडणुकीत भाजपा आणि बाळासाहेब यांची शिवसेना यांचे सर्व उमेदवार सर्व १४ जागांवर विजयी झाले.

भविष्यात फोंडाघाट शहर अध्यक्ष म्हणून अजित नाडकर्णी यांच्यावर जबाबदारी सोपविणार असल्याचे आमदार नितेश राणे यांनी यावेळी सांगितले.

सर्व सीट निवडून आल्यानंतर कणकवलीत फटाक्यांची आतशबाजी करून विजयो त्सव साजरा केला गेला. सर्वांचे अभिनंदन आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा