You are currently viewing केरी समुद्रात बुडालेल्या चौघांचेही मृतदेह आढळले

केरी समुद्रात बुडालेल्या चौघांचेही मृतदेह आढळले

पेडणे

सेल्फी काढण्याच्या नादात केरी येथील श्री आजोबा मंदिराच्या नजीक बुडालेल्या अन्य दोघांचे मृतदेह सोमवारी सकाळी शोधण्यात यश आले. चौघांपैकी दोघांचे मृतदेह रविवारी सायंकाळीच मिळाले होते. सदर ठिकाण धोकादायक असल्याचा फलक लावूनही त्याकडे संबंधितांनी दुर्लक्ष केल्याने ही दुर्घटना घडली.केरी येथे रविवारी बार्देश तालुक्यातील म्हापसा व कांदोळी भागातील २३ जणांचा ग्रुप सहलीसाठी केरीत आला होता. एकाच कुटुंबातील धोकादायक ठिकाणी सेल्फी घेण्यात दंग होते. त्याचवेळी मोठी लाट आल्याने चौघेजण घसरुन समुद्रात पडले. सकिना खातून (१८), मोहम्मद बाकी अली (२४) यांचे मृतदेह रविवारी सापडले होते. रात्री उशिरा शोधमोहीम थांबविण्यात आली होती.

सोमवारी सकाळी दोनही मृतदेह शोधण्यात शोध पथकाला यश आले. पैकी एक मृतदेह बुडाले त्याच ठिकाणी तर दुसरा तेरेखोल किल्ल्याजवळ आढळून आला. मोहम्मद अलीम अख्तर (१८) व मोहम्मद येसिन (१४) अशी त्यांची नावे आहेत.
एकाच ठिकाणी चौघांचा बुडून मृत्यू होण्याची पेडणे तालुक्यातील ही पहिलीच दुर्दैवी घटना आहे. सेल्फी काढण्यासाठी मुले ज्या खडकावर उभी होती त्याठिकाणी ‘डेंजर झोन’ फलक लावण्यात आला होता. त्या फलकाकडे त्यांनी दुर्लक्ष केले. त्यानंतर सेल्फी घेण्यात मग्न असताना नोरदार लाट आली व चारही मुले लाटेबरोबर समुद्रात बुडाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 − five =