You are currently viewing सावंतवाडीतील स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये रमजान ईद उत्साहात साजरी

सावंतवाडीतील स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये रमजान ईद उत्साहात साजरी

सावंतवाडी :

 

आज सावंतवाडी येथील स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना ईद चे महत्त्व समजावून सांगण्यात आले. यावेळी शिक्षिका जरिन शेख यांनी रमजान ईद या सणाविषयी माहिती सांगितली. त्यात रमजाद ईद हा सण का साजरा केला जातो व त्यामागील मुख्य कारण कोणते? तसेच या सणाचे महत्त्व माहितीत सादर केले गेले. त्याचप्रमाणे या सणानिमित्त जो उपवास केला जातो त्यामागेही आपले शारीरिक स्वास्थ कसे निरोगी राहू शकते याचे वैज्ञानिक कारण सांगितले गेले.

त्यानंतर इयत्ता चौथीच्या विद्यार्थी व विद्यार्थीनींनी या सणानिमित्त नृत्य सादर केले. तसेच आपल्या भावी पिढीमध्ये सर्वधर्म समभाव ही शिकवण रुजवावी याकरिता रमजान ईद सणावर आधारित इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी नाट्य सादर केले. या नाट्याचे बोल सहा. शिक्षिका नफिसा शेख यांनी सादर करून कशा प्रकारे बंधुभावाने प्रत्येक जातीधर्माचे लोक एकत्र येतात हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकमेकांना ईद मुबारक देऊन कार्यक्रमाची सांगता केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा