मनसेमध्ये जोरदार इनकमिंग सुरूच…

मनसेमध्ये जोरदार इनकमिंग सुरूच…

पिंगुळी, नेरूर मुळदे व कुडाळ येथील युवकांनी केला मनसेत प्रवेश

…तर मनसे पिंगुळी उपविभाग अध्यक्ष पदी सर्पमित्र विष्णू म्हस्के यांची निवड

कुडाळ :

मनसेमध्ये सध्या जोरदार इनकमिंग चालू असून राजसाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन युवावर्ग मोठ्या प्रमाणावर संघटनेकडे आकर्षित होत आहे. दरम्यान कुडाळ येथील कार्यक्रमात उपतालुकाध्यक्ष दिपक गावडे यांच्या माध्यमातून पिंगुळी, नेरूर, मुळदे व कुडाळ मधील युवकांनी पक्षाची प्राथमिक सदस्य नोंदणी करत मनसेमध्ये प्रवेश केला. यावेळी जिल्हा सचिव बाळा पावसकर, तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, माजी तालुकाध्यक्ष बाबल गावडे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, कुडाळ शहर सचिव रमा नाईक, कुडाळ उपशहर अध्यक्ष वैभव परब, विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष हितेंद्र काळसेकर, विभाग अध्यक्ष सुंदर गावडे, रामा सावंत, उपविभाग अध्यक्ष श्रीपाद अडसुळे, विष्णू म्हस्के आदी पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी आयोजित कार्यक्रमात रमेश शिंदे, कान्होजी नाईक, यश उमपूरकर, ऋत्विक ठाकूर, सर्वेश ठाकूर, अनिकेत ठाकूर, गौरव कुडाळकर, सिद्धांत मेस्त्री, नारायण नाईक, सुरज नेरूरकर आदी युवकांनी मनसेचा झेंडा हाती घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा