You are currently viewing “श्री गणेश जयंतीच्या सर्वाना शुभेच्छा!”

“श्री गणेश जयंतीच्या सर्वाना शुभेच्छा!”

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरुण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*”श्री गणेश जयंतीच्या सर्वाना शुभेच्छा!”*     

 

ओंकार गणपती जन पूजा करिती

सिद्धी बुद्धी दाता कलेची देई स्फूर्ति!!धृ!!

 

वैशाख पुनवेला असे वरद पुष्टीपती

भाद्रपद चतुर्थीला पार्थिवास पुजिती

माघ शुक्ल चतुर्थीला गणेश जयंती!!1!!

 

शिवपार्वती व्रत करिती हो पुत्रप्राप्ती

शीर तुटून पडे शनीचे वक्रदृष्टी

हरी जोडे हत्तीशीर बाल देहाती!!2!!

 

तुंदिल तनु अपराध घेई उदरात

सुपकर्णे गुण दोष घेई पदरात

सृष्टीचे करी अवलोकन सूनेत्री!!3!!

 

पार्वती माता प्रेमें देई मोदक हाती

अग्रमान मिळे कार्यारंभी तुज पुजिती

सर्वांसाठी कनवाळु तव अगाध ख्याती!!4!!

 

श्री अरुण गांगल.कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.

Cell. 9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 + 16 =