You are currently viewing रविद्रनाथ मुसळे यांच्या अपघाती मृत्यु प्रकरणी सखोल चौकशी करा

रविद्रनाथ मुसळे यांच्या अपघाती मृत्यु प्रकरणी सखोल चौकशी करा

मुख्याधिकारी,पोलिसांना शिवसेना नगरसेवकांचे निवेदन; संबंधितांवर गुन्हा दाखल करा..

कणकवली

कणकवली नगरपंचायत व ठेकदार यांच्यामार्फत कणकवली रेल्वे स्टेशन येथे राज्यमार्ग १८१ कनेडी फोंडा या मार्गावर १२ फुट खोलीचे गटार खोदण्यात आले आहे. गेले तीन दिवस गटार खोदाईचे काम सुरु आहे. सदर रस्त्यावरून हे गटार जात असल्याने रस्ता देखील १२ फुट खोल खोदण्यात आला आहे. मात्र या मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही काळजी घेतलेली नसल्याने अथवा बँरिकेट देखील लावले नाहीत.त्यामुळे कणकवली शहरातील विद्यानगर येथील रविद्रनाथ वसंत मुसळे वय ६९ हे रविवारी ११ डिसेंबर २०२२ त्या रत्यावरून दुचाकीने जात असताना खोदलेल्या गटाराचा त्यांना अंदाज न आल्याने गटारात पडून ते गंभीर जखमी झाले होते.त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र अपघाताच्या धक्यातून न सावरलेल्या रविंद्रनाथ मुसळे यांचा सोमवारी १२ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ०८ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला.रविद्रनाथ मुसळे यांच्या अपघाती मृत्यु प्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी,अशी मागणी मुख्याधिकारी,पोलिसांना शिवसेना नगरसेवकानी निवेदन देत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी नगरसेवक कन्हैया पारकर,गटनेते सुशांत नाईक, नगरसेवक रुपेश नार्वेकर,शहराध्यक्ष उमेश वाळके आदी उपस्थित होते.

रवींद्रनाथ मुसळे हे कणकवली रोटरी क्लब पदाधिकारी, कणकवली कंझ्युमर्स सोसायटीचे संचालक, गोपुरी आश्रमचे पदाधिकारी होते. शहरातील सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचे योगदान होते. समाजोपयोगी उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच सहभाग असाचाय. कणकवली रोटरी क्लबच्या व्हाईस प्रेसिडेंस म्हणून पुढील वर्षाकारिता त्यांची नुकतीच नियुक्त करण्यात आली होती. कणकवली नगरपंचायत प्रशासन व ठेकेदार यांच्या बेजाबाबदार पणामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला. कणकवली शहरातून जाणाऱ्या राज्यमार्ग १८१ कनेडो फाँडा या मार्गांच्या खोदाईचे काम करताना वाहतुकीच्या इष्टीने सर्व उपाययोजना करणे आवश्यक होते. काम पूर्ण होईपर्यंत सदर रस्ता बंद करून पर्यायी व्यवस्था करणे सरजेचे होते. त्याठिकाणी वाहतूक पोलीस तैनाद करणे गरजेचे होते. बॅरीकेट व सूचना फलक लावून राज्यामार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना सुरू असलेल्या कामाची कल्पना देणे गरजेचे होते. मात्र रविवारी ११ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी गटार खोदाईचे काम बंद झाल्यानंतर सदर मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना सदर ठिकाणी करण्यात आलेली नव्हती. विशेष म्हणजे सदर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीच्या अखत्यारीत येत असून काम सुरु करतेवेळी सबंधित विभागाला देखील कामाची पूर्व कल्पना देण्यात आलेली नाही. त्याचा फटका रविद्रनाथ वसंत मुसळे यांना बसला असून कणकवली नगरपंचायत प्रशासन व ठेकेदार यांनी रस्ता खोदाई करताना नियमांची पायमल्ली केल्यानेच खोदलेल्या गटाराचा रविद्रनाथ मुसळे यांना अंदाज न आल्याने अपघात होऊन १२ फुट खोल गटारात पडून ते गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कणकवली नगरपंचायत प्रशासन व ठेकेदार यांनी रविंद्रनाथ मुसळे यांच्या मृत्यूची कोणतीही जबाबदारी घेतली नाही. त्यामुळे सदर ठिकाणचे सी. सी. टीव्ही कॅमरे तपासून सदर प्रकरणाची आपण स्वतः सखोल चौकशी करून रविद्रनाथ मुसळे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कणकवली नगरपंचायत प्रशासन व ठेकदार यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच रविद्रनाथ मुसळे यांच्या सेवेप्रमाणे त्यांच्या कुटुंबियांना कणकवली नगरपंचायत मार्फत आर्थिक मदत मिळावी.,अशी मागणी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा