You are currently viewing परूळे-बाधघाटी येथे चिरे वाहतुक करणारा डंपर पलटी होऊन अपघात 

परूळे-बाधघाटी येथे चिरे वाहतुक करणारा डंपर पलटी होऊन अपघात 

मालवण

परूळे बाधघाटी उतारावर दुसऱ्या डंपरला साईड देत असताना चिरे वाहतुक करणारा डंपर घरावर पलटी होऊन अपघात झाला. ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली. यात घराचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.याबाबत अधिक माहिती अशी की, चौके हुन परूळेच्या दिशेने चिरे घेऊन येत असताना दुसरऱ्या डंपरला साईट देत असताना परूळे आचपेवाडी येथील लिंलाधर सामंत याच्या घरावर डंपर पलटी झाला. या अपघाता दरम्यान घराच्या दोन भिंती कोसळल्या व छपराचे नुकसान झाले. वाळू आण्यासाठी भरधाव वेगाने डंपर जात असताना चिरे वाहतुक करणारा डंपरचालक गोंधळला. मात्र समोरा समोर डंपरचा अपघात वाचविण्यासाठी त्याने डंपर बाजूला घेत असता डंपरवरील ताबा सुटला. डंपर रस्त्याच्या बाजूला असलेल्या घरावर कलंडला यात घराचे नुकसान झाले आहे. निवती पोलिस घटना स्थळी जाऊन पंचनामा केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा