You are currently viewing गुळदुवे येथील एसटी स्टॉप वर पोलिसांनी गस्त घालून  मद्यपान करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी 

गुळदुवे येथील एसटी स्टॉप वर पोलिसांनी गस्त घालून  मद्यपान करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी 

मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे आरोंदा पोलिसांना  निवेदन सादर

गुळदुवे येथील एसटी स्टॉप वर मोठ्या प्रमाणात नागरिकांची, विध्यार्थीची ये-जा होत असते. सदर बस स्थानक हे वस्तीपासून काही अंतरावर आहे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना तेथील नागरिकांनी तक्रारी दिल्या आहेत मागील बरेच दिवस त्या ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांचा धिंगाणा तसेच बाटल्या फोडण्याचे प्रकार होत आहेत त्यानुसार आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोदा पोलिसांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे गुळदुवे येथील एसटी बस स्टॉप जवळ जास्ती रहदारी नसल्याने बस स्थानकला मद्यपान करणाऱ्या लोकांचा विळख झाला आहे. तेथील बस स्थानक जवळ बसून रात्री- अपरात्री काही अज्ञात लोकांकडून मद्यपान तसेच त्या बाटल्या त्या ठिकाणीच फोडून धिंगाणा घालण्याचा प्रकार मागील काही दिवस सुरू असल्याचे तक्रारी तेथील ग्रामस्थांकडून मनसेचे पदाधिकारी श्री राजेश मामलेकर यांच्याकडे दिल्याने आज त्याची दखल घेत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोदा पोलीस स्टेशन गाठले व लेखी निवेदन देत त्या ठिकाणी होणाऱ्या चुकीच्या गोष्टींची कारवाईची केली मागणी तसेच मनसेच्या माध्यमातून सदर स्टॉप वर सोलर लाईट बसविण्यात आली होती त्याचीही चोरी झाली असल्याने सदर बाब ही त्या ठिकाणी मद्यपान करणाऱ्या कडूनच झाली असल्याचा संशय व्यक्त होत आहे त्यामुळे निवेदनाद्वारे त्या ठिकाणी पोलिसांनी गस्त घालून सदर मद्यपान करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आज मनसेच्या माध्यमातून पोलिसांकडे करण्यात आली आहे तर सदर बाबतीची दखल घेण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन देण्यात आले यावेळी मनसे लॉटरी सेनेचे तालुकाध्यक्ष राजेश मामलेकर तिरोडा शाखाअध्यक्ष मनोज कांबळे दिलीप पालकर मयूर पालकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 1 =