You are currently viewing शंकरराव गवस यांची झोळंबे माऊली देवस्थान उपसमितीच्या अध्यक्षपदी निवड

शंकरराव गवस यांची झोळंबे माऊली देवस्थान उपसमितीच्या अध्यक्षपदी निवड

दोडामार्ग :

 

झोळंबे माऊली देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमितीच्या अध्यक्षपदी शंकरराव गवस, सचिवपदी सचिन गवस तर खजिनदारपदी राजेश न गवस यांची एकमताने निवड करण्यात आली. झोळंबे ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत ही निवड करण्यात आली.यावेळी स्थानिक सल्लागार उपसमितीच्या सदस्य पदी सुकाजी गवस, सतेश गवस, शिवराम गवस, मधुसूधन गवस, ज्ञानेश्वर गवस, विलास गवस, पांडुरंग गवस, मनोहर गवस, संजय गवस, सखाराम गवस, हरी भिडे, शरद कांबळे यांची निवड करण्यात आली.

झोळंबे माऊली देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमितीचे अध्यक्ष शंकरराव गवस यांचे शिवसेनेचे दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी अभिनंदन केले. यावेळी झोळंबे सरपंच विशाखा नाईक, उपसरपंच विनायक गाडगीळ, जगदीश गवस, शिवशक्ती कला क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष मुन्ना गवस, झोळंबे माऊली दुग्ध संस्थेचे अध्यक्ष दीपक गवस, ग्रामपंचायत सदस्य विनिता गवस, संजना गवस, उज्वला कांबळे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 4 =