You are currently viewing सावंतवाडीत राणेंना पुन्हा एक धक्का …..

सावंतवाडीत राणेंना पुन्हा एक धक्का …..

सावंतवाडी

अमित वेंगुर्लेकर यांच्या मार्गदर्शनानुसार आणि रुपेश पावसकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाप्रमुख संजय पडते यांची संघटनात्मक बांधणी करण्याच्या पद्धतीवर प्रभावीत होऊन महाराष्ट्र राज्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री मा.अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार दिपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते शिवबंधन बांधून भगवा झेंडा हाती घेऊन सावंतवाडी मधील राणे समर्थक कार्यकर्ते ह्युमन राईट्स चे अध्यक्ष सतिश साटम, प्रसिद्ध उद्योगपती मोजेस डिसिल्वा, ह्युमन राईट्स सदस्य पंढरी राऊळ, दिनार तेली, ज्ञानेश्वर भितये, मुजावर, श्यामसुंदर चव्हाण, रीचड रॉड्रिक्स, सॅव्हियो संबया, फॅक्रिस रॉड्रिक्स आदी राणे समर्थक भाजप कार्यकर्तेंनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी रुपेश पावसकर, अमित वेंगुर्लेकर, युवासेना जिल्हा समन्वयक सुशिल चिंदरकर, कुडाळ चे कार्यकर्ते राजू गवंडे, बाळा पावसकर, बबन बोभाटे, नितीन सावंत उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा