You are currently viewing मालवण शहर व सिंधुदुर्ग किल्ल्याचा विकास…..

मालवण शहर व सिंधुदुर्ग किल्ल्याचा विकास…..

मालवण शहर व सिंधुदुर्ग किल्ल्याचा विकास…..

मालवण

वायरीतील ठाकरे गटाच्या लोकांनी निष्कारण आमच्या विरोधात निषेध करून वक्तव्य केलं आहे त्यांचा निषेध करत आहोत.
मालवणच्या बैठकीमध्ये मालवणचा विकासाबद्दल चर्चा झाली. अनेक विषयावर बोलत असताना. मालवणच्या स्वच्छतेच्या विषयावर अधिकाऱ्यांनी माहिती दिली. मालवणच्या बीचची स्वच्छता, लोकांची सुरक्षा, आणि सौंदर्यासाठी त्यांना एक हजार कोटी रुपये लागतील. हे करण्यासाठी त्यांना स्थानिक लोकांना नोकरीवर घ्यावे लागेल. त्याचबरोबर मालवणच्या अर्धवट राहिलेल्या भूमिगत गटारांसाठी कॉन्ट्रॅक्टर बदलावा लागेल. घनकचऱ्याचे नियोजन करण्यासाठी दुसरीकडे मोठा डम्पिंग ग्राउंड करून मालवणची स्वच्छता करता येईल. त्याचबरोबर पर्यटकांसाठी जेटी व सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्याची व्यवस्था करण्यासाठी एक ठोस नियोजन करावे लागेल.
या सर्वाला अनुसरून आम्ही आपले मत व्यक्त केले की पर्यटकांच्या सुविधासाठी बीचच्या स्वच्छतेसाठी सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्याचे सोयी निर्माण करण्यासाठी हे काम मालवण नगरपालिकेकडे सोपे. किल्ल्याचा हस्तांतर करायचा कुठेही विषय आला नाही. आम्हाला माहीतच नव्हतं की असा काही विषय आहे.
छत्रपती शिवरायांबाबत गमजा मारणारे ठाकरे गटातल्या लोकांना मला एवढंच सांगायचं आहे. तुम्ही किल्ल्याच्या संरक्षणासाठी सुशोभीकारणासाठी आतापर्यंत काय केले आहे. उगाच विकासाच्या कामांमध्ये दुष्टभावनेने राजकारण करायचा प्रयत्न करू नये.
मी सैन्यात असताना मराठा रेजिमेंट मध्ये होतो. आमची युद्ध गर्जना ‘बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय’ ही होती. ज्या ज्यावेळी आम्हाला शत्रू वर हल्ला करायचा प्रसंग आला त्या त्यावेळी ही युद्ध गर्जना म्हणूनच आम्ही हल्ले केले. रोज शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय आम्ही झोपत नव्हतो. सिंधुदुर्ग किल्ल्याशी आमचे नाते शिवछत्रपतींशी भक्तीचे! खासदार झाल्यावर देखील सिंधुदुर्ग किल्ला वाचवण्यासाठी केंद्र सरकारकडून निधी मंजूर करून घेतला व बऱ्याच ठिकाणी किल्ल्याची डागडुजी केली. किल्ल्याबद्दल काही करायचे असले तरी आर्किऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ला सांगितल्याशिवाय करता येत नाही. त्यांच्या प्रमुखांना मी सिंधुदुर्ग किल्ल्यावर नेऊन सर्व दाखवले. इतकी चांगली वास्तू जी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधली आहे तिचं संरक्षण केलं पाहिजे आणि लोकांना बघण्याचं सुद्धा परवानगी असली पाहिजे म्हणून लेखी मागणी केली आहे. तसेच सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याचा देखील आमचा प्रयत्न आहे. तरी जे जे लोक किल्ला बघायला येतील त्यांची सोय करून देणे हे आपलं कर्तव्य आहे. एवढाच विषय आहे आणि तो महत्त्वाचा आहे. याबाबत ठाकरे गटाच्या वायरीतील लोकांना का विरोध असावा. स्वतः तर काही करत नाही आणि दुसऱ्याला काय करू देत नाहीत अशा प्रकारची हीन मानसिकता या लोकांची आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे आणि सिंधुदुर्ग किल्ल्याची राखण करणे आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. तरी यात राजकारण आणू नये. शेवटी शिवसेना हे काम करत आहोत. कायदेशीर रित्या शिवसेनेचे निशाणी सुद्धा आम्हाला मिळाली आहे. हे पोटात धरून काहीतरी बेजबाबदार व्यक्तव्य करू नये. आपली इच्छा असेल तर वायरी मध्ये येऊन आम्ही चर्चा करायला तयार आहोत. पण चांगला गोष्टी करायला जात असताना लोकांची दिशाभूल करू नये अशी माझी लोकांना विनंती आहे. पुढे सर्वांनी मिळून सिंधुदुर्ग किल्ल्याचा विकास केला. महाराजांविषयी दोन प्रश्नांची उत्तरे देवू न शकणाऱ्या माणसांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही. हे महाराष्ट्रातील भूषण चांगल्या स्थितीत ठेवलं पाहिजे. किल्ला कोणाचा मालकीचा आहे हे आम्हाला कोणालाच माहीत नाही. जर तो वायरीच्या मालकीचा असेल तर ठाकरे गटांनी किल्ल्यासाठी काहीतरी करावे. उगाचच काही चांगल्या गोष्टी करताना इतर लोकांना दोष देऊ नये ही विनंती.
-ब्रिगेडिअर सुधीर सावंत
माजी खासदार

प्रतिक्रिया व्यक्त करा