You are currently viewing शिक्षणमंत्रांच्या जिल्ह्यातीलच डीएड बेरोजगारांचे उपोषण, भूषणावह नाही – अमित सामंत

शिक्षणमंत्रांच्या जिल्ह्यातीलच डीएड बेरोजगारांचे उपोषण, भूषणावह नाही – अमित सामंत

ओरोस

सिंधुदुर्ग ओरोस येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डीएड बेरोजगारांनी आपल्याला शिक्षक भरतीमध्ये प्राधान्य मिळावे यासाठी आमरण उपोषण दिनांक २७ मार्च पासून सुरूवात केली असुन त्यात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर असुन काही महिला आपल्या तान्हूल्या बाळासह उपोषणात सहभागी झालेल्या आहेत,मात्र अशा परिस्थितीत प्रशासनाचे अधिकारी सोडाच पण या जिल्ह्याचे सुपुत्र व राज्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर हे स्थानिक असुनही आज तीन दिवस झाले तरी उपोषण स्थळी साधी भेट देऊ शकत नाहीत हे या जिल्ह्याचे दुर्दैव म्हणावे का ॽ गेले दोन दिवस शिक्षण मंत्री जिल्ह्यात विविध ठिकाणी दौऱ्यात सहभागी आहेत,पण ज्या खात्याची जबाबदारी आहे त्या विभागाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डीएड बेरोजगारांचे गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरु केले आहे, त्यांचे प्रश्न सोडाच पण शिक्षण मंत्री त्या बेरोजगारांची भेट घेण्याचे सुद्धा औदार्य दाखविले नाही, म्हणजे सत्तेची धुंदी कशी असते याचे हे ज्वलंत उदाहरण आहे,दिपक केसरकर हे सावंतवाडी मतदारसंघ मर्यादित आमदार असतील पण या महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री आहेत हे ते कदाचित विसरले असतील, त्यामुळेच त्यांना ओरोस येथे बेरोजगारांच्या उपोषणस्थळी भेट देण्याचा विसर पडला असेल,हे निंदनीय आहे,असे मत व्यक्त करून सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे उपोषणकर्ते डीएड बेरोजगार तरुणांच्या आंदोलनास पाठिंबा जाहीर करत असून तुमचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा महाराष्ट्र विधानमंडळाचे विरोधी पक्षनेते ना.अजिदादा पवार यांच्या पर्यंत आपल्या भावना पोहोचवून न्याय देण्याचा प्रयत्न करू असे लेखी पत्र दिले, यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत जिल्हा सरचिटणीस भास्कर परब कुडाळ तालुका अध्यक्ष शिवाजी घोगळे अल्पसंख्याक कार्याध्यक्ष नझीर भाई शेख उपस्थित होते,

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × two =