You are currently viewing राज्यात १ जूनपासून सागरी मासेमारी बंद..

राज्यात १ जूनपासून सागरी मासेमारी बंद..

सिंधुदुर्ग

राज्याच्या जलधी क्षेत्रात यांत्रिकी मासेमारी मौकांना १ जून ते ३१ जुलै वा कालावधीत पावसाळी मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबत राज्याचे मत्स्य व्यवसाय आयुक्त डॉ. अतुल पाटणे यांनी आदेश जारी केले आहेत. मासेमारी बंदी आदेशाचा भंग होऊ नये याची दक्षता घेण्यात यावी अन्यथा सागरी अधिनियमाद्वारे कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

यांत्रिकी नौकांना बंदी आदेश लागू असून पारंपरिक पद्धतीने बिगर यांत्रिकी पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मासेमारीस बंदी नाही. राज्याच्या जलधी क्षेत्रात खोल समुद्रात सागरी किनान्यापासून १२ मैलाच्या पुढे जाणाऱ्या मासेमारी नौकांना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना लागू राहणार आहेत. सागरी किनाऱ्यापासून १२ मैलापर्यंत बंदी कालावधीत मासेमारी करताना आढळल्यास महाराष्ट्र सागरी नियमन अधिनियमानुसार संबंधित नौका, सर्व साधनसामग्री आणि मासळी जप्त करण्यात येणार आहे. तसेच कठोर कारवाई केली जाणार आहे. पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करताना अपघात झाल्यास शासनाकडून कोणतीही मदत मिळणार नाही, असे आदेशात स्पष्ट नमूद करत पावसाळी मासेमारी बंदी आदेशाचा भंग होणार नाही याची दक्षता मच्छीमारांनी घ्यावी, असे आवाहनही मत्स्य व्यवसाय विभागाच्या आयुक्तांनी केले आहे |

प्रतिक्रिया व्यक्त करा