You are currently viewing मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या प्रतिनिधींना जिल्ह्यात फिरू देणार नाही; संदिप मेस्त्री यांचा ईशारा.

मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या प्रतिनिधींना जिल्ह्यात फिरू देणार नाही; संदिप मेस्त्री यांचा ईशारा.

कणकवली

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मायक्रोफायनान्स कंपन्यांनी जिल्यातील बचत गटाच्या महिलांना दिलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी व व्याजाच्या रकमेसाठी तगादा लावण्यात येत आहे.गेले आठ महिने बचत गटाच्या महिलांच्या हाताला रोजगार नसून,त्यांची आर्थिक परवड होत आहे.अशा स्थितीत असा तगादा लावून फोनवरून वसुलीसाठी धमक्या देण्यात येत आहेत मात्र हे प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत. याबाबत आमदार नितेश राणे यांचेही लक्ष वेधण्यात येणार आहे.मात्र हा तगादा थांबला नाही तर,तशीच वेळ आल्यास मायक्रो फयनान्स कंपन्यांच्या प्रतिनिधींना जिल्ह्यात फिरू देणार नसल्याचा ईशारा भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संदिप मेस्त्री यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine + five =