You are currently viewing इन्सुली येथे विजयी संकल्प अभिषेक

इन्सुली येथे विजयी संकल्प अभिषेक

*खासदार विनायक राऊत वाढदिवसाचे औचित्य*

 

बांदा / सावंतवाडी:

 

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मंदिरात आज शुक्रवारी ‘विजयी संकल्प अभिषेक’ करण्यात आला.

सिंधुदुर्ग शिवसेना (उबाठा) जिल्हा समन्वयक चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांच्या इन्सुली (ता.सावंतवाडी) येथील श्री देवी माऊली मंदिरात बाळा गावडे यांनी अभिषेक केला.

यावेळी या देवस्थानचे खास मानकरी तात्या परब, विभाग प्रमुख फिलिप्स रॉड्रिक्स, उपविभाग प्रमुख सचिन पालव, युवासेना विभागप्रमुख संदीप कोठावळे, शाखप्रमुख उल्लास गावडे, रघुवीर देऊलकर, न्हानु कानशे, मनोहर गावकर, बाबुल खान, उल्लास सावंत व शिवसैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा