You are currently viewing न्हावेली येथील स्थानिक सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष सावळाराम गंगाराम नाईक यांचे निधन

न्हावेली येथील स्थानिक सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष सावळाराम गंगाराम नाईक यांचे निधन

न्हावेली गावातील पहिले अभियंता

न्हावेली, ता.सावंतवाडी येथील स्थानिक सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष तसेच न्हावेली गावातील पहिले अभियंता म्हणून ओळख असणारे सावळाराम गंगाराम नाईक (वय ७५) यांचे सोमवारी सकाळी ८.०० वाजता उपचार सुरू असतानाच दुःखद निधन झाले. गेले काही दिवस ते धारगळ, गोवा येथील रेडकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये दाखल होते.
आपल्या मनमिळावू स्वभावामुळे त्यांचे अनेकांशी जवळचे संबंध होते. ज्या काळात जिल्ह्यात शिक्षणाची सोय नव्हती तेव्हा सावळाराम नाईक हे अभियंता झाले होते. तिलारी पाटबंधारे प्रकल्प, टाळम्बा पाटबंधारे प्रकल्प येथे त्यांनी प्रकल्प अभियंता म्हणून काम केले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रकल्प अधिकारी म्हणून येण्यापूर्वी चिपळूण येथील पाटबंधारे प्रकल्प अभियंता म्हणून देखील त्यांनी काम पाहिले होते. टाळम्बा पाटबंधारे प्रकल्प येथून ते वरिष्ठ अभियंता म्हणून निवृत्त झाले होते. आपल्या सारखेच गावातील तरुणांनी देखील शिकून मोठे व्हावे असाच त्यांचा नेहमी प्रयत्न असायचा. सावळाराम नाईक यांच्या निधनाने गावात शोक व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सुना, नाती, भाऊ, विवाहित बहिणी, वहिनी,पुतणे असा मोठा परिवार आहे. सावंतवाडी येथील पत्रकार राजेश नाईक यांचे ते काका तर वेंगुर्ले फळ संशोधन केंद्रातील अधिक्षक सुनील नाईक यांचे ते भाऊ होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 − eight =