You are currently viewing आमचं नाशिक

आमचं नाशिक

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा. सदस्या लेखिका कवयित्री अख्तर पठाण लिखित अप्रतिम काव्यरचना*

~*आमचं नाशिक* ~

*जन्मभूमी भारत , आमची मायभूमी नाशिक*
*जो कोणी येतो इथे, होतो हिचा आशिक*

*सीता गुफा, राम मंदिर, पंचवटीतील वृक्ष*
*राम, सीता, लक्ष्मण यांच्या वनवासाची साक्ष*

*पांडवलेणी, चामरलेणी चा ऐतिहासिक वारसा*
*आहे जणू नाशिकच्या संस्कृतीचा आरसा*

*नाशिक मधील “बडी़ दर्गाह” म्हणजे नाशिककरांची जान*
*”सादिक शाह हुसैनी बाबा” यांना नाशिक च्या “शहनशाह”चा मान*

*इथल्या वातावरणाने इंग्रजांनाही भुरळ पाडली*
*म्हणून तर त्यांनी इथे मुद्रणालये काढली*

*गंगापूर धरण भागवते नाशिककरांची तहान*
*कुंभमेळ्याची पर्वणी लाभली नाशिक शहर आमचे महान*

*बारा ज्योतीर्लिंग पैकी एक त्र्यंबकेश्वरची महती न्यारी*
*श्रावणाच्या पावन पर्वात करावी ब्रम्हगिरीची वारी*

*सावरकरवाडा, फाळके स्मारक, कुसुमाग्रज प्रतिष्ठान*
*नाशिकचे वैभव अन् नाशिक ची शान*

*नाशिकची चहा, भेळ, मिसळ यांचे खूप मोल*
*सगळीकडेच दुमदुमतोय आता नाशिकचा ढोल*

*कायम स्मरणात राहील नाशिकची प्रत्येक आठवण*
*कळसुबाईचे शिखर देते उंच ध्येयाची शिकवण*

*कालिका माता आहे नाशिकची ग्रामदेवता*
*पावन झाले नाशिक जेव्हा अवतरली गंगा सरिता*

*आमची माणसं प्रेमळ, मायाळू आमची माती*
*पुन्हा इथेच जन्म घ्यावा , अशी अतूट इथली नाती*

✍🏻 *अख़्तर पठाण*
*(नासिक रोड)*
*मो.:- 9420095259*

 

_______________________________
*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा