You are currently viewing एप्रिल फूल

एप्रिल फूल

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा. सदस्या लेखिका कवयित्री सौ आदिती मसुरकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*एप्रिल फूल*

 

एप्रिल फूलची कळी उमलता,

हास्य तरंग वाहू लागतात.

लटका राग चेहऱ्यावर दिसे,

उकळ्या आनंदाच्या फुटू लागतात.

 

मजा ती फसवण्याची,

सर्वांना भरपूर हसवण्याची.

दांभिकता, खोटेपणा नसतोच मुळी,

वेळ निखळ आनंद लुटण्याची..

 

वर्षातून एकदाच येतो,

उडवतो एकमेकांची खिल्ली,

माकडचेष्टा करून जातो

पसरतो आनंद गल्लोगल्ली .

 

एप्रिल मासाच्या आगमनाची,

चाहूलच असते न्यारी.

एप्रिल फूल करण्याची,

मजाच असते भारी.

 

*✒️©सौ. आदिती मसुरकर*

*कुडाळ सिंधुदुर्ग*

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × five =