You are currently viewing डांगमोडेतील श्री देव रवळनाथ मंदिरातील श्री भवानी देवीचा वार्षिक गोंधळ उत्सव उत्साहात संपन्न

डांगमोडेतील श्री देव रवळनाथ मंदिरातील श्री भवानी देवीचा वार्षिक गोंधळ उत्सव उत्साहात संपन्न

मालवण / मसुरे :

 

मालवण तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून उल्लेख केल्या जाणाऱ्या मसुरे डांगमोडे येथील श्री देव रवळनाथ मंदिरातील श्री भवानी देवीचा वार्षिक गोंधळ उत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.

दारू बंदीचा पुरस्कर्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मसुरे डांगमोडे येथील श्री देव रवळनाथ मंदिरातील श्री भवानी देवीचा वार्षिक गोंधळ उत्सव शुक्रवारी पार पडला श्री देव रवळनाथ मंदिरात भाविकांनी सकाळपासूनच गर्दी करीत श्री चे दर्शन घेतले तर सायंकाळपासून श्री भवानी देवीचा वार्षिक गोंधळाच्या कार्यक्रमास सुरुवात झाली रात्री गोंधळ उत्सवाची मांडणी झाल्यानंतर उपस्थित भाविकांनी श्री देव रवळनाथ समोर गाऱ्हाणे घालीत नवस फेडले व बोलले तसेच महिला वर्गानी खण नारळाने ओट्या भरल्या. यावेळी उपस्थित भाविकांनी श्री देवी भवानीचा उदो उदो करीत रात्रभर जागर मांडला या उत्सवाच्या निमित्ताने मसुरे डांगमोडे येथील अजित अनिल ठाकूर या युवकाने मंदिराचा गाभारा तसेच मंदिरात आकर्षक फुलांची लक्षवेधी सजावट केली होती तर वेरलीच्या श्री बाळा मेस्त्री यांनी आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. यावेळी उपस्थित भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला.

या उत्सवाच्या निमित्ताने नवतरुण मित्र मंडळाने कबड्डी व क्रीकेट स्पर्धेचे आयोजन केले होते या कार्यक्रमास आम वैभव नाईक, हरी खोबरेकर, मंदार केणी, पंकज वर्दम व इतर मंडळींनी उपस्थिती दर्शविली.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × five =