You are currently viewing देश आर्थिक समृद्ध करण्यासाठी इंजिनीयर विद्यार्थ्यांनी उद्योजक बनावे – केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांचे आवाहन

देश आर्थिक समृद्ध करण्यासाठी इंजिनीयर विद्यार्थ्यांनी उद्योजक बनावे – केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांचे आवाहन

एस.एस.पी.एम.कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग च्या ” उत्तुंग” या वार्षिक स्नहसंमेलनात गुणवंतांचा केला सत्कार

कणकवली

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे वारसदार म्हणून देशात लोककल्याणकारी राज्य निर्माण करुया. देशाच्या समृध्दीत हातभार लावू देश आत्मनिर्भर करुया, त्यासाठी इंजिनीयर होणाऱ्या ५० टक्के विद्यार्थ्यांनी उद्योजक बनले पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने देशात आर्थिक उन्नती येईल असे आवाहन केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले.
एस.एस.पी.एम.कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग च्या ” उत्तुंग” या वार्षिक स्नहसंमेलनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्ष सौ. नीलम ताई राणे,सेक्रेटरी,आमदार नितेश राणे,प्राचार्य श्री. गांगल,व्यवस्थापक शांतेश रावराणे आदी प्रमुख उपस्थित होते. या सर्वांचे स्वागत जनरल सेकरेटरी चैतन्य आरेकर ,योगिता लोके,ओमकार सावंत यांनी केले.

विद्यार्थ्यांसमवेत सभासदांना केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे म्हणाले,आजचा दिवस मोठा उत्साहाचा आहे.मला तुम्हाला भेटायला आनंद होतो.तुम्ही भावी नागरिक म्हणून इंजिनिअर होणार आणि देशाचे भविष्य घडविण्यात आपला मोलाचा वाटा असेल.जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा देशाची अर्थव्यवस्था दहाव्या स्थानवर होती.आज देश पाचव्या स्थानी आणला आहे. २०३० साली तिसऱ्या व्यास्थानी भारत देशाला पंतप्रधान श्री.मोदी यांना न्यायचा आहे. त्यासाठी उद्योजक बना आणि देशाला आर्थिक सक्षम करा असे आवाहन केद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले.

प्रत्येक व्यक्तीने आपली वाटचाल प्रगतीच्या दिशेने करायला हवी. असे सांगताना केद्रीय मंत्री राणे म्हणाले,१ लाख ९५ हजार वार्षिक दरडोई उत्पन्न आपल्या लोकांचे आहे ते उत्पन्न वाढले पाहिजे,२० कोटी उद्योजक बनले पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपल्याला कोण बनायचे आहे हे आजच निच्छित करावे.असे आवाहन केले.

कोकणातील माणूस किती शिकला तरी नोकरीच्या काही ठराविक मर्यादा आहे. मी मुख्यमंत्री असताना मीटिंग घेतली तेव्हा एकही इंजिनिअर नव्हता म्हणून हे कॉलेज उभे केले.आज या एस एस पी एम चा विध्यार्थी प्रत्येक क्षेत्रात आहे. हे अभिमानाची गोष्ट आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी २०० कोटींचे आधुनिक उद्योगांचे प्रशिक्षण देणारे सेंटर उभारत आहेत. निश्चितच त्याचा लाभ जिल्ह्याला होईल असा विश्वास केंद्रीय मंत्री राणे यांनी व्यक्त केला.५० टक्के इंजिनिअर हे उद्योजक व्हावे,ही माझी अपेक्षा आहे. त्यासाठी लागणारे संपूर्ण सहकार्य माझ्या खात्यातून केली जाईल.१९९० आली ३५ हजार उत्पन्न आलेल्या जिल्हा मी आज प्रगती कडे नेला.त्यावेळी जे प्लानिग केले त्यामुळे अनेक प्रक्रिया उद्योग या जिल्ह्यात सुरू झाले.माझ्या जील्हातील मुलं शिकावित आणि अदाणी, अंबानी सारखे उद्योजक व्हावेत अशी माझी आपेक्ष आहे. कॉलेज म्हणजे नैतिकता,जबादरी असते. माझा देश, राज्य ,कुटुंब याच्या प्रगतीला ध्यास घेवून शिका उद्योजक व्हा. असे आवाहन त्यांनी केले.६ कोटी ३० लाख छोटे उद्योजक कार्यरत आहेत ही संख्या १२ कोटी पर्यंत न्यायची आहे. त्यासाठी मार्गदर्शन देणार, आर्थिक सहाय्य देणार. तुम्ही या आभियानात स्वतः सहभागी व्हा.असे सांगताना आसाम मधील एका युवतीचे उदाहरन मंत्री राणे यांनी दिले ते.म्हणाले,एक मुलगी १५ हजार लोकांना नोकरी देते,मशरूम बनवते आणि ते परदेशात पाठवते तुम्ही सुद्धा असेच वेगळ्या क्षेत्रात आत्मनिर्भर व्हा. भारत मातेकडून फार अपेक्षा आहेत. त्यामुळे तुम्ही गुणवत्ता निर्माण करा. मोठे उद्योजक व्हा. असे आवाहन केले.

शैक्षणिक क्षेत्रात  कोणते बदल अपेक्षित आहेत ते आम्ही अभ्यासतो आणि त्या पद्धतीच्या सुविधा निर्माण करून देतो. इंजिनीयर घडत असतानाच तो उद्योजक ही घडला पाहिजे म्हणून कोकणातील पहिले ‘इन्क्यूबेशन सेंटर’ इंजीनियरिंग कॉलेजमध्ये लवकरच सुरू केले जाणार आहे. अशी घोषणा संस्थेचे सेक्रेटरी आमदार नितेश राणे यांनी केली.
या इन्क्यूबेशन सेंटर चा फायदा विद्यार्थ्यांना होणार. चागलं इंजिनियर घडवण्याचा आपचा प्रयत्न आहे त्या इंजिनीयरना उद्योजक घडावायचा आमचा उद्देश आहे.आदरणीय राणे साहेब आणि आई यांच्या कष्टातून उभे राहिलेले एस.एस.पी.एम. इंजीनियरिंग कॉलेज आहे. त्याचा शिक्षणाचा दर्जा कायम राखला जाणार आहे.या कॉलेजच्या यशाची परंपरा आपल्याला क्षणोक्षणी जाणवते, कॉलेजचे विद्यार्थी अनेक क्षेत्रात प्रगती करत आहेत. नावलौकिक मिळवत आहेत. या दोन माजी विद्यार्थ्यांनी शासकीय नोकरीत स्थान मिळवले, त्यांनी आपले मनोगत व्यक्त करून या कॉलेजच्या यशस्वी अध्ययनाची पोच पावती दिली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर करणारे या कॉलेजमधून शिकलेले इंजिनियर हे आमचे भूषण आहे. असे आमदार नितेश राणे म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 5 =