अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने घेतली तहसिलदारांची भेट

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने घेतली तहसिलदारांची भेट

कोविड विषयक नेमणूका व लसीकरणाबाबत चर्चा

सावंतवाडी

प्राथमिक शिक्षकांच्या कोविड विषयक कामकाजाच्या नेमणूकांमधील त्रुटी व सर्व शिक्षकांचे लसीकरणाबाबत मागण्यांचे निवेदन देण्यासाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, सावंतवाडी यांच्यावतीने संघटनेचे राज्य संयुक्त चिटणीस म.ल देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सावंतवाडी तहसिलदार राजाराम म्हात्रे यांची भेट घेतली. यावेळी कोविड आजाराच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांसंदर्भात विविध विषयावर तहसीलदारांची सकारात्मक चर्चा करण्यात आली.

यात कोविड-19 ड्युटीवरील सर्व प्राथमिक शिक्षकांचे ड्युटीपूर्वी लसीकरण करणे संदर्भात तहसिलदार कार्यालायकडून आरोग्यविभागाला आदेश पारित करणे सर्व शंभर टक्के प्राथमिक शिक्षकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करणे, चेक पोस्ट वरील कामकाजातून महिला शिक्षक, गंभीर आजारी,मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय विकार, तसेच ५३ वर्षावरील शिक्षक, गर्भवती महिला, स्तनदा माता असतील यांना या कामातून वगळण्यात यावे, कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर परजिल्ह्यात उन्हाळी सुट्टीत मुळ गावी जाण्यासाठी शिक्षकांना मुख्यालय सोडण्याची परवानगी द्यावी, उन्हाळी सुट्टीत काम केले त्याची पर्यायी अर्जित रजा मिळावी आदी मागण्यांचे निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा