You are currently viewing राणे यांच्याच मुळे सतिश सावंत यांना प्रतिष्ठा; सुरेश सावंत

राणे यांच्याच मुळे सतिश सावंत यांना प्रतिष्ठा; सुरेश सावंत

सिंधुदूर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी आमदार नितेश राणेंवर टीका करताना पूर्वीचे दिवस विसरू नये, राणे यांच्यामुळेच सतीश सावंत यांना प्रतिष्ठा मिळाली, याकडे सुरेश सावंत यांनी लक्ष वेधले.
साधा ग्रामपंचायत सदस्य नसतानासुद्धा नारायण राणे यांनी सतीश सावंत यांना जिल्हयातील सर्व मोठी पदे दीली. आपण ज्या वेळी संचायनी प्रकरणात अडचणीत होता तेव्हा किशोर राणेंच्या बरोबर नारायण राणे यांच्याकडे विनंती करायला गेला हे विसरू नका,आता जे कार्यकर्ते नितेश राणेंच्या बरोबर ते आपल्या बरोबर काम करत होते ते अचानक वझे कसे झाले?आणि आपण अचानक सज्जन कसे झालात? तेव्हा आपल्याला दिसले नाही का? त्यामुळे आमदार नितेश राणे यांच्यावर टीका करत असताना जिल्हा बँकमध्ये खरे वझेची भूमिका आपण बजावत आहात हेही येणाऱ्या दिवसात दिसून येईल,गेली काही महिने गायब असलेले,आपली पक्षातील होणारी घुसमट,जिल्हा बँक निवडणूक येताच पक्ष निष्ठा अचानक जागृत होऊन सैरभैर वक्तव्य करताना दिसत आहेत, आपली शिवसेनेतील भविष्यात अडगळीततले सतीश सावंत अशीच असेल अशी टिका सुरेश सावंत यांनी केली आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 + eighteen =