You are currently viewing दिलीप वळसे पाटील राज्याचे नवे गृहमंत्री

दिलीप वळसे पाटील राज्याचे नवे गृहमंत्री

मुंबई

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यानंतर आता लगेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्याकडे राज्याचे गृहमंत्रीपद सुपूर्द करण्यात आले आहे. अनिल देशमुखांनंतर गृहमंत्रीपदासाठी अनेक नवे पुढे येत होती. त्यापैकी दिलीप वळसे पाटील यांचे नाव सर्वाधिक चर्चेत होते. त्यामुळे, दिलीप वळसे पाटील हे कोणत्याही क्षणी राज्याचा गृहमंत्रीपदाचा पदभार स्वीकारू शकतात.

सचिन वाझेंना अनिल देशमुखांनी महिन्याला बार-रेस्टॉरंट्सकडून १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप परमबीर सिंग यांनी केला होता.

त्याबाबत अॅड. जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने CBI चौकशीचे आदेश र दिल्यानंतर तातडीने अनिल देशमुखांनी आपला राजीनामा सुपूर्द केला असून ते आता दिल्लीसाठी रवाना देखील झाले आहेत. तर दुसरीकडे, दिलीप वळसे पाटील हे कोणत्याही क्षणी राज्याचा गृहमंत्रीपदाचा पदभार स्वीकारू शकतील.

अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचे पत्र स्वीकृतीसाठी राज्यपालांकडे

तर अनिल देशमुखांचा राजीनामा स्वीकारावा असे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिले आहे. गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा असेही या पत्रात म्हटले आहे. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याबाबत देखील पत्रात विनंती करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven + 2 =