You are currently viewing पालकमंत्री दीपक केसरकरांना अंबाबाई मंदिरात अडवलं, कोल्हापूरकर संतापले

पालकमंत्री दीपक केसरकरांना अंबाबाई मंदिरात अडवलं, कोल्हापूरकर संतापले

कोल्हापूर :

 

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सचिव पदावरून शिवराज नाईकवाडे यांना अचानक हटवल्यानंतर सोशल मीडियातून संताप व्यक्त होत आहे. अनेकांना वुई सपोर्ट शिवराज नाईकवाडे असा हॅश टॅगही चालु केला आहे. तर नाईकवाडे यांना सपोर्ट करण्यासाठी कोल्हापूरकर एकवटले आहेत. जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी त्यांचा पदभार का काढून घेतला असा सवाल कोल्हापुरकरांनी केला आहे. दरम्यान आज पालकमंत्री दीपक केसरकर यांना कोल्हापूर वासियांनी घेराव घातला.केसरकर यांना जाब विचारण्यासाठी कोल्हापूरकर अंबाबाई मंदिर परिसरात एकत्र जमले यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या विरोधात संताप व्यक्त केला.

यावेळी संतप्त नागरीकांनी शिवराज नाईकवाडे यांना सचिव पदावरून का हटवलं? कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला एका रात्रीत हटवण्याचे कारण काय? जिल्हाधिकारी मनमानी करत असल्याचा आरोप कोल्हापूरकरांनी केला. जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात कोल्हापूरकरांनी घोषणाबाजी करत ज्योतिबा चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा नायकवाडे यांना पदभार द्यावा अशी मागणी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − thirteen =