You are currently viewing यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार अझीम प्रेमजी यांना प्रदान

यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार अझीम प्रेमजी यांना प्रदान

*यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार अझीम प्रेमजी यांना प्रदान*

*यशवंतरावांप्रमाणेच अझीम प्रेमजी यांनी समाजाच्या हितासाठी कार्य केले : शरद पवार*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

यशवंतराव चव्हाण यांचे देशाचा आणि राज्याचा विकास करणारा नेता असे अलौकिक व्यक्तिमत्व होते. एक नेता कसा आदर्श असावा, याचे ते उत्तम उदाहरण होते. त्यांच्या विचारानुसार तळागाळात कार्य करणारे खान्देशचे सुपुत्र अझीम प्रेमजी यांनीही संपत्ती ही भल्यासाठी असते, या विचारातून समाजात परोपकार करत आपली बांधिलकी जपली, त्यामुळे त्यांना यशवंतराव चव्हाण यांच्या नावे राष्ट्रीय पुरस्कार देताना आनंद होत आहे, असे विचार सेंटरचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्ताने राष्ट्रीय पुरस्कार सामाजिक बांधिलकी जोपासणारे उद्योजक अझीम प्रेमजी यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. ते अपरिहार्य कारणामुळे उपस्थित राहू न शकल्यामुळे त्यांच्या वतीने के. आर. लक्ष्मीनारायण यांनी सेंटरचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीप्ती नाखले यांनी सन्मानपत्राचे वाचन केले.
यशवंतराव चव्हाण यांनी तळागाळातील जनतेच्या आणि समाजातील घटकांचा विचार केला. त्यांच्यासाठी कार्य केले, त्यांच्या कार्याचा आपल्यावर प्रभाव राहिला, त्यांच्या नावे मिळणारा पुरस्कार हा माझ्यासाठी सन्मान आहे, असे विचार अझीम प्रेमजी यांनी दूरचित्रफितीद्वारे संवाद साधताना व्यक्त केले.
पुरस्कार समितीचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी या पुरस्काराविषयीची माहिती दिली तसेच आतापर्यंत देण्यात आलेल्या पुरस्कार विजेत्यांच्या यादीत अझीम प्रेमजी यांचाही समावेश झाला असून त्यांचा हा यथोचित गौरव असल्याचे नमूद केले.
प्रास्ताविक सेंटरच्या कार्याध्यक्षा व खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केले. सेंटरच्या वतीने विविध पातळ्यांवर राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांविषयीची माहिती त्यांनी दिली. सेंटरच्या वतीने यशवंत संवाद ऍप हे सोशल मिडियावर उपलब्ध करण्यात आले आहे. तसेच आदिवासी विकासाचेही कार्य सेंटरच्या वतीने अधिक प्रभावीपणे राबविण्यात यावे, यासाठी स्वतंत्र विभाग सुरु करण्यात येणार असल्याचे तसेच मानसिक आरोग्यासाठी हेल्पलाईन सुरु करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रतिभा शिंदे यांनी आदिवासी विकासाच्या कार्याबाबतचे सादरीकरण केले.
शरद पवार इंस्पायर फेलोशिप (साहित्य) प्राप्त झालेले सोलापूरचे असीम चाफळकर यांचे जनुककोशशास्त्र हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. आपल्या स्वागतपर भाषणात अरुण गुजराथी यांनी अझीम प्रेमजी यांच्या कार्याचा गौरव करत यशवंतराव चव्हाण सेंटरचे काम समाजात तळागाळात पोहचत आहे तसेच कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून देशपातळीवर मोठ्या प्रमाणावर कार्याचा विस्तार होत असल्याचे सांगितले.
कार्यवाह हेमंत टकले यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित भुरे यांनी केले.

 

*संवाद मीडिया*

*👮‍♂️!! खुशखबर! खुशखबर!!👮‍♂️*

*👮‍♂️भारतीय सैन्यदलात (आर्मी, नेवी, एअर फोर्स) अधिकारी होण्याची नामी संधी.*👮‍♀️

*_सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे 15 दिवसांचे निवासी NDA प्रवेश परीक्षा व SSB interview मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे._*

*_🔸सदर शिबिर १ एप्रिल २०२३ ते १५ एप्रिल २०२३ या कालावधीत इ. ११वी व १२वी (विज्ञान) झालेल्या विद्यार्थ्यांकरिता आहे. सदर प्रशिक्षण शिबिर निवासी असून यामध्ये प्रामुख्याने NDA लेखी परीक्षेचे सखोल मार्गदर्शन व SSB मुलाखत प्रशिक्षण, साहसी खेळ, obstacle training, स्वयं सुरक्षा, रायफल शूटिंग व personality development तसेच सर्व प्रकारचे खेळ यांचा समावेश आहे._*

*_👇खालील लिंक वर क्लिक करून  संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा_*

https://forms.gle/xxSJxjZSbXXao8hc9

*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*

*📲राजेंद्र गावडे : 9403366229*

*📲 नागेश पांढरे : 9422073840*

*📲Office : 9420195518, 7822942081*

*Advt link …👇*

*————————————–*

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + ten =