You are currently viewing *लेडी गागा-रिहाना यांच्या गाण्यांवर मात करत ‘नाटू-नाटू”ने जिंकला ऑस्कर*

*लेडी गागा-रिहाना यांच्या गाण्यांवर मात करत ‘नाटू-नाटू”ने जिंकला ऑस्कर*

*लेडी गागा-रिहाना यांच्या गाण्यांवर मात करत ‘नाटू-नाटू”ने जिंकला ऑस्कर*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

ऑस्कर २०२३ च्या विजेत्यांचा सन्मान आज भारतीय वेळेनुसार पहाटे करण्यात आला. हॉलिवूडच्या सर्वात मोठ्या पुरस्कार सोहळ्यामध्ये भारताने आपले नाव झळकावले आहे. दक्षिणेच्या आरआरआर चित्रपटातील नाटू-नाटू या गाण्याने इतिहास रचताना हा मान पटकावला आहे. हा पुरस्कार स्वीकारताना एमएम कीरावानी यांनी आपल्या मनोगताने सर्वांची मने जिंकली आहेत. इतकेच नाही तर नातू-नातूने या विजयासह प्रसिद्ध गायिका रिहाना आणि लेडी गागा यांच्या गाण्यांनाही मागे टाकले आहे. नाटू-नाटूने कोणती गाणी मागे टाकून हे यश मिळवले आहे, जाणून घेऊया:-

ऑस्कर २०२३ मध्ये नाटू-नाटूने ‘सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचे’ शीर्षक पटकावले आहे. टेल इट लाइक अ वुमन अ‍ॅप्लॉज, टॉप गन: मॅव्हरिक्स होल्ड माय हँड, ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर लिफ्ट माय अप, आणि एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स दिस इज अ लाइफ या गाण्यांवरही विजय मिळवला. अशाप्रकारे हा भारताचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वात मोठा विजय ठरला आहे.

गाण्याचे संगीतकार एमएम कीरावानी ऑस्कर २०२३ पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर पोहोचले. सन्मान मिळाल्यानंतर त्यांनी गाणे म्हणत मनोगत व्यक्त केले. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल एमएम कीरावानी यांनी सर्वांचे आभार मानले. त्यांनी आपल्या शब्दात सर्वांचे आभार मानले. पुरस्कार मिळाल्याचा आनंद कीरावणीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये ९५ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

नाटू नाटू हे गाणे आरआरआर चित्रपटातील आहे. दक्षिणेतील प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी तो बनवला आहे. या चित्रपटात टॉलीवूड सुपरस्टार राम चरण आणि ज्युनियर एनटीआर तसेच बॉलीवूड स्टार अजय देवगण आणि आलिया भट्ट देखील आहेत. या पॅन इंडिया चित्रपटाने भारतात 750 कोटींची कमाई केली आहे. त्याच वेळी, जगभरातील बाजारपेठेत त्याचे कलेक्शन 1100 कोटींहून अधिक आहे.

 

*👮‍♂️👮‍♂️सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली👮‍♂️👮‍♂️*

*🔺समर हॉलिडे कॅम्प*🔺

*_🔹The colonel’s Academy for adventure & aero spots आणि सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे उन्हाळी सुट्टीत साहसी व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिरे_*

*🔹शिबिर कालावधी – 15 एप्रिल ते 21 एप्रिल 2023 व 22 एप्रिल ते 28 एप्रिल 2023*

*🔹वयोमर्यादा – 10 वर्षावरील मुली व मुले*

*🔹प्रशिक्षणाचे विषय🔹*

*_🔸पिटी, योगा, कराटे, रॅपलिंग, ट्रेकिंग, व्हॅली क्रॉसिंग, रॉक क्लाइंबिंग, फायरिंग, लीडरशिप डेव्हलपमेंट, सेल्फ डिफेन्स, बर्ड अँड प्लांट ऑब्झर्वेशन, स्पोर्ट, ग्रुप डिस्कशन, गेस्ट लेक्चर वगैरे_*

*👇खालील लिंक वर क्लिक करून संबंधित माहिती सर्व फॉर्म सबमिट करावेत*

https://forms.gle/CVGoWJbpoiQ4yeGW8

*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*

*📲राजेंद्र गावडे : 9403366229*

*📲 संजय शिंदे : 9307051091*

*📲Office : 9420195518, 7822942081*

*Advt link …👇*

*————————————–*

*संवाद मीडिया*

*👮‍♂️!! खुशखबर! खुशखबर!!👮‍♂️*

*👮‍♂️भारतीय सैन्यदलात (आर्मी, नेवी, एअर फोर्स) अधिकारी होण्याची नामी संधी.*👮‍♀️

*_सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे 15 दिवसांचे निवासी NDA प्रवेश परीक्षा व SSB interview मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे._*

*_🔸सदर शिबिर १ एप्रिल २०२३ ते १५ एप्रिल २०२३ या कालावधीत इ. ११वी व १२वी (विज्ञान) झालेल्या विद्यार्थ्यांकरिता आहे. सदर प्रशिक्षण शिबिर निवासी असून यामध्ये प्रामुख्याने NDA लेखी परीक्षेचे सखोल मार्गदर्शन व SSB मुलाखत प्रशिक्षण, साहसी खेळ, obstacle training, स्वयं सुरक्षा, रायफल शूटिंग व personality development तसेच सर्व प्रकारचे खेळ यांचा समावेश आहे._*

*_👇खालील लिंक वर क्लिक करून  संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा_*

https://forms.gle/xxSJxjZSbXXao8hc9

*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*

*📲राजेंद्र गावडे : 9403366229*

*📲 नागेश पांढरे : 9422073840*

*📲Office : 9420195518, 7822942081*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve + 6 =