You are currently viewing २५ जून रोजी संजीवनी हॉस्पिटल कणकवली येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

२५ जून रोजी संजीवनी हॉस्पिटल कणकवली येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

कणकवली :

 

रोटरॅक्ट क्लब ऑफ कणकवली सेंट्रल, रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल आणि सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक २५ जून २०२२ रोजी सकाळी ठीक १०:०० वा संजीवनी हॉस्पिटल कणकवली येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी सर्व रक्तदात्यांनी उपस्थित राहून रक्तदान करावे असे आवाहन रोटरी क्लब अध्यक्ष रोट. डॉ. विद्याधर तायशेटे व रोटरॅक्ट क्लब ऑफ कणकवली सेंटरचे अध्यक्ष रो. श्रद्धा पाटकर यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी मिहिर तांबे ७८७५३५८१५४, निखिल पांगम ९४२१२५४९१७ वर संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा