You are currently viewing जागतिक कौशल्य विकास स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

जागतिक कौशल्य विकास स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

जागतिक कौशल्य विकास स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

 जागतिक स्तरावरील कौशल्य स्पर्धेच्या पूर्व तयारीच्या दृष्टीने जिल्ह्यातील उमेंदवारांसाठी  जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 मध्ये फान्स (LYON)  येथे आयोजित होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छूक उमेदवारांनी www.skillindiadigital.gov.in  या लिंकवर जाऊन दि. 20 डिसेंबरपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त गणेश चिमणकर यांनी केले आहे.

जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षानी होते आणि ही जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा असून जगभरातील 23 वर्षाखालील तरूणांकरीता त्यांच्यातील कौशल्य सादर करण्याची स्पर्धा ही ऑलिम्पिक खेळांसारखीच आहे. यापूर्वी 46 व्या जागतिक स्पर्धेमध्ये 62 सेक्टरमधून देशातील 10000 उमेदवार समाविष्ट झाले होते आणि या स्पर्धा 15 देशांत 12 आठवडयासाठी आयोजित करण्यांत आली होती. यावर्षीची जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 फ्रान्स (LYON) येथे आयोजित होणार आहे.

जागतिक कौशल्य विकास स्पर्धा 2024 आयोजित करण्याबाबत राष्ट्रीय कौशल्य विकास परिषद (NSDC) National Skill Development Council) मार्फत मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 करिता वयोमर्यादा हा एकमेव निकष असून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराचा जन्म 1 जानेवारी 1999 किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे. जिल्ह्यात कार्यरत असलेल्या ITIS, Polytechnic, MSME Tools Rooms, CIPET, Engineering College, IHM, Hospitality Institute, Corporate Technical Institute, Skill Training Institute, Colleges, Institute of Jewellery Making, Others मधील उमेदवार यात सहभागी होऊ शकतील. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छूक उमेदवारांनी दिनांक 20 डिसेंबर 2023 पर्यंत नोंदणी करावी. जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे.

संवाद मिडिया*

*मिड नाईट कार्निवल*

आता ऑफिस किंवा बिझनेसच्या वेळे मध्ये शो – रूम ला येण्याची गरज नाही..
खास आपल्या सुविधे करिता आम्ही हजर असणार आहोत रात्री उशिरा पर्यंत..
https://sanwadmedia.com/119321/

आकर्षक डिस्काउंट , टेस्ट ड्राइव्ह डेमो सहित रिफ्रेशमेंट सुविधा उपलब्ध..

आजच भेट द्या अथवा कॉल करा..

*एस.पी.ऑटोहब*
रत्नागिरी |. चिपळूण | कणकवली
*7477-959595*

*Advt Web link👇*
https://sanwadmedia.com/119321/
*———————————————-*
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा